आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'रुपयावर बलात्कार करणा-यांना शिक्षा नाही का? चेतन भगतच्या ट्विटने \'टिवटिवाट\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशामध्ये सध्या दोन शब्द फार गाजत आहेत. एक 'बलात्कार' आणि दुसरा 'घसरण'. या दोन्हींचा मेळ घालून प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी गुरुवारी एक ट्विट केले आहे. यामुळे सोशल मीडियात टिवटिवाट सुरु झाला आहे.

भगत यांनी रुपयाच्या घसरणीवरून 'माझ्यावर बलात्कार करणा-यांना शिक्षा नाही का? असा प्रश्न रुपया विचारीत आहे. ' अशा अर्थाचे ट्विट केले. वाढत्या बलात्काराच्या घटनांनी देशाचे मन हेलावून गेलेले असताना या शब्दाचा असा वापर केल्याबद्दल नेटीझन्सनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.

नेटीझन्सचा पारा वाढत असल्याचे पाहून भगत यांनी त्यांचे ट्विट काढून घेत दुसरे ट्विट केले आहे. त्यात ते लिहितात, 'बलात्कार या शब्दाबद्दल काहीजणांनी आक्षेप घेतला आहे. त्या ऐवजी हत्या हा शब्द योग्य वाटतो का? थांबा... या शब्दावरुनही हल्ला होण्याची शक्यता आहे.'

पुढील स्लाइडमध्ये, या आधीही चेतन भगत राहिले आहेत वादग्रस्त