आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhagan Bhujabal Comment On Uddhav And Raj Today Meet In Mumbai

उद्धव आणि राज एकत्र आल्यास फायदाच- म्हणाले राष्ट्रवादीचे छगन भुजबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- उद्धव आणि राज हे एकत्र आल्यास त्यांच्यातील कौटुंबिक संबंध तर सुधारतीलच, परंतु या दोघांसाठी राजकीय फायदाही होऊ शकतो, असे मत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले.

‘उद्धव आणि राज एकत्र यावेत ही बाळासाहेब व शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या सर्वांचीच इच्छा होती आणि आहे. सुरुवातीच्या काळात मीही त्यांना तसे समजावले होते. आज ते एकमेकांशी बोलले. भविष्यात ते एकत्र येतील की नाही, याबाबत मी अंदाज वर्तवणार नाही. त्यांना मी कोणताही सल्ला देणार नाही. ते स्वत: निर्णय घेण्यास सक्षम आहे. मात्र त्यांनी एकत्र यावं ही लोकांची इच्छा आहे. त्यांचे दोघांचे पक्ष वेगळे आहेत. भविष्यात ते दोघे काय निर्णय घेतील, त्यांना शुभेच्छा,’ असे भुजबळांनी स्पष्ट केले.
बाळासाहेबांच्या पहिल्या स्मृतीदिनी राज ठाकरे का उपस्थित राहिले नाहीत, याबाबतची कारणं काहीही असतील, मात्र ‘देर आए दुरुस्त आए’ असं म्हणावं लागेल, असा टोलाही भुजबळांनी लगावला.