आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhagan Bhujabal Income Tax News In Marathi, Kirit Somaiya

छगन भुजबळांनी पाच वर्षांपासून आयकर भरला नाही; लाचलुचपत विभागाकडे तक्रार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे खासदार पुत्र आणि आमदार पुत्रांने यांनी गेल्या पाच वर्षांपासून आयकर भरला नसल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी केला. किरीट सोमय्या यांनी पुराव्यादाखल लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे भुजबळ यांच्या विरोधात तब्बल 330 पानांची तक्रार केली आहे.

सोमय्या म्हणाले, 2009 मध्ये छगन भुजबळ, खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांनी निवडणूक लढवताना प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यानुसार त्यांची संपत्ती 21 कोटी रुपये होती. मात्र पाच वर्षांत ही संपत्ती तब्बल 2655 कोटींच्या घरात गेली आहे. भुजबळ यांनी 11 कंपन्यांचा बुडवला असल्याचा दावाही सोमय्या यांनी यावेळी केला.

दरम्यान, यापूर्वी सोमय्यांनी भुजबळांवर दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामात 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता.