आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांशी संबंधित बांधकाम संस्थाही चाैकशीच्या फेर्‍यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्याविराेधात मनी लाँडरिंगप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाशी संबंधित बांधकाम कंपनी चमणकर एंटरप्रायझेसकडे चाैकशीचा माेर्चा वळवला. त्यातील कृष्णा, प्रणिता व प्रसन्ना चमणकर यांची चाैकशी मंगळवारी करण्यात आली. त्यात काही महत्त्वाची माहिती समाेर आल्याचा दावा संचालनालयातील अधिकार्‍याने केला.

नवीन महाराष्ट्र सदनाच्या बांधकामासंदर्भात चमणकर आणि राज्य सरकारदरम्यान झालेल्या कराराबाबतही सर्व तपशील तपासण्यात आला. हे कंत्राट त्यांना देताना कायदेशीर अटी व बाबींची पूर्तताही करण्यात आली नसल्याचाही आराेप आहे. त्यांच्याकडून भुजबळांशी संबंधित व्यावसायिक आस्थापना व ट्रस्टना माेठ्या रकमा दिल्या गेल्याबाबतही माहिती घेण्यात येत आहे. भुजबळांकडून संलित प्रवेश कन्स्ट्रक्शन्स या कंपनीचे समभाग खरेदी केल्याप्रकरणी युवराज शेट्टी यांचीही चाैकशी करण्यात आली. त्यासाेबतच त्यांच्याशी संबंधित असलेल्या नवी मुंबईतील चार कंपन्यांबाबतही सर्व माहिती संचालनालय गाेळा करत आहे. त्याच्या संचालकांनी तेथे सनदी लेखापाल नियुक्त केला हाेता. त्यांनी संचालकांच्या सूचनांनुसार कागदपत्रांवर स्वाक्षरी करायची हाेती, असेही त्यातून निदर्शनास आल्याचे संचालनालयातील या अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.