आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळ पुन्हा जेजे रुग्णालयात; पंधरा दिवसांपूर्वीच मिळाला होता डिस्चार्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- छातीत दुखू लागल्याने माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्र सदन प्रकरणी भ्रष्टाचाराचा आरोप असलेले भुजबळ सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळून त्यांची आर्थर रोड तुरुंगात रवानगी झाली होती.

भुजबळ यांच्या वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. शनिवारी सकाळपर्यंत त्या पुर्ण झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीविषयी नेमकी माहिती देता येईल, असे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे. दीड महिन्यांपुर्वी १५ सप्टेंबर रोजी ताप आणि अंगदुखीच्या कारणास्तव भुजबळांना जे.जे. रुग्णालयात दाखल केले होते.
तसेच त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्याही प्रमाणापेक्षा खुपच कमी झाल्याने त्यांना अनियमित रक्तदाबाचा त्रास जाणवत होता. अखेर महिन्याभराच्या वास्तव्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी त्यांची पुन्हा तुरूंगात रवानगी करण्यात आली होती. तसेच त्यावेळी भुजबळांच्या काही वैद्यकीय चाचण्या करणे आवश्यक असून त्या चाचण्यांसाठी त्यांना खाजगी रुग्णालयात हालवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र रुग्णालय प्रशासनाने आपल्याशी तशा प्रकारचा कोणताही पत्रव्यवहार केला नसल्याचे तुरूंग प्रशासनाने सांगितले होते. भुजबळांना दमा, अतिरिक्त तणाव आणि रक्तदाबाचा जुना त्रास असून त्या आधारावर त्यांनी दोन वेळा उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याच्या सुचना देऊन उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज दोन्ही वेळा फेटाळला होता.
बातम्या आणखी आहेत...