आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनी लाँडरिंग: छगन भुजबळांचा मुक्काम तुरूंगातच, 31 मार्चपर्यंत न्या. कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छगन भुजबळ (फाईल फोटो) - Divya Marathi
छगन भुजबळ (फाईल फोटो)
मुंबई- महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडीच्या कोठडीत असलेल्या छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे माजी खासदार समीर यांची आज ईडी कार्यालयात समोरासमोर पाच तासाहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास समीर यांना ईडी कार्यालयात आणण्यात आले. ईडीला छगन भुजबळ यांच्याकडून जी उत्तरे अपेक्षित होती. मात्र, भुजबळ यांनी याबाबत आपल्याला काहीही ठाऊन नसल्याचे सांगितल्याने ईडीने थेट भुजबळ चुलते-पुतण्याला समोरासमोर आणले. दरम्यान, छगन भुजबळ यांची आज पोलिस कोठडी संपल्याने आज त्यांना पुन्हा कोर्टासमोर हजर करण्यात आले. यावेळी मुंबई कोर्टाने भुजबळांना 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली.
छगन भुजबळ यांची ईडीने सोमवारी तब्बल 11 तास चौकशी केली. भुजबळांना या दरम्यान विस्ताराने 50 हून अधिक प्रश्न विचारले गेले. यातील 35 प्रश्नांची उत्तरे भुजबळांनी दिली. मात्र, 15 हून अधिक प्रश्नांची ते उत्तरे देऊ शकले नाहीत. संबंधित प्रश्नांशी माझा काहीही संबंध नसल्याने त्याच्याबाबत मला माहिती नाही व त्यामुळे त्याची उत्तरे देण्यास असमर्थ आहे असे छगन भुजबळ यांनी सोमवारी ईडीच्या अधिका-यांना सांगितले होते. त्यानंतर ईडीने भुजबळ यांना अटक केली व तीन दिवसाची कोठडी मागितली. मात्र, कोर्टाने दोन दिवसाची कोठडी दिली. आज कोठडी संपत असल्याने ईडीने सकाळीच समीर यांना पाचारण करून ज्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत त्याबाबत समीर व छगन भुजबळ यांची समोरासमोर चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सकाळी दहापासून या चुलते-पुतण्याची चौकशी करण्यात आली.
छगन भुजबळांची कोठडी वाढली?
छगन भुजबळ यांना सोमवारी अटक केल्यानंतर आज त्यांची दोन दिवसाची कोठडी संपली. त्यामुळे आज पुन्हा एकदा भुजबळांना सेशन्स कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर भुजबळ यांना 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

भुजबळ यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड, 2 डॉक्टर ईडी कार्यालयात
ईडीच्या कोठडीत असलेले भुजबळ यांनी बुधवारी संध्याकाळी अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली. यामुळे जेजे हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे पथक पाठवण्यात आले. जेजे हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले की, भुजबळ यांनी बरे वाटत नसल्याची तक्रार केल्यानंतर त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक पाठवण्यात आले. भुजबळांचा जुना ईसीजी आणि नुकताच काढलेल्या ईसीजीमध्ये बदल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे भुजबळांना आज जे जे रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...