आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र सदन घोटाळा : छगन भुजबळांना २ दिवसांची कोठडी; विधिमंडळात गोंधळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंगळवारी न्यायालयाने १७ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली. दरम्यान, भुजबळ यांच्या अटकेचा मुद्दा दिवसभर विधानसभेतही गाजला. विरोधी पक्षांनी ही अटक म्हणजे राजकीय सूड असल्याचा आरोप केला. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप फेटाळून लावला. या मुद्द्यावरून विधानसभेत कामकाज वारंवार तहकूब करावे लागले. शेवटी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
सोमवारी सकाळी सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई येथील मुख्यालयात छगन भुजबळ चौकशीसाठी हजर झाले. दिवसभराच्या चौकशीनंतर रात्री उशिरा भुजबळ यांना अटक करण्यात आली. मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास भुजबळ यांना वैद्यकीय तपासणीसाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास त्यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या आवारातील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.

सुमारे दोन तास न्या. भावके यांच्यासमोर चाललेल्या युक्तिवादादरम्यान ईडीच्या वतीने अॅड. हितेन वेणेगावकर यांनी बाजू मांडली. संपूर्ण चौकशीदरम्यान भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी तब्बल ३५ प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती देत भुजबळ हे चौकशीत सहकार्य करत नसल्याचा दावा वेणेगावकर यांनी केला. तसेच या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी भुजबळ यांना किमान तीन दिवसांची ईडी कोठडी देण्याची मागणी केली. त्यावर आपले अशील तपास यंत्रणांना योग्य ते सर्व सहकार्य करत असून यापुढेही ते सहकार्य कायम राहील. तसेच त्यांना चौकशीसाठी गरज असेल तेव्हा तपास यंत्रणा बोलावू शकतात, असा युक्तिवाद भुजबळ यांच्या वतीने अॅड. पी.के.ढाकेफळकर यांनी केला.

मुंडेंनी मांडली तहकुबी सूचना
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याबाबत तहकुबी सूचना मांडली. भुजबळ आमदार, खासदार, मंत्रिपदी राहिलेले आहेत. त्यांच्या अटकेने जनमानसांत संतापाची लाट आहे. त्यामुळे सभागृहाने कामकाज बाजूला ठेवून या मुद्यावर चर्चा करावी, असे मुंडे म्हणाले. मात्र, या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप होत राहिले आणि शेवटी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, चांगल्या कामाचे या वयात हेच फळ का? : भुजबळांनी स्वत:च मांडली बाजू...कंठ दाटून येतो तेव्हा...मला माहीत नाही...हा राजकीय सूड : शरद पवार..... चर्चाच होऊ शकत नाही : मुख्यमंत्री