आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुजबळ जेजे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; दुसर्‍या हॉस्पिटलची मागणी नाकारली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जेजे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. भुजबळांना दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय अद्याप होऊ शकला नाही. परिणामी त्यांना ऑर्थर रोड तुरुंगात नेण्यात येत आहे.

दुसरीकडे, भुजबळ यांच्या वकीलांनी त्यांना दुसर्‍या रुगणालयात उपचारासाठी हलवण्यात यावे, अशी मागणी आर्थर रोड तुरुंगाकडे केली होती. पण कोर्टाने ती नाकारली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भुजबळांवर जेजे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत चढउतार होत आहेत. त्यासाठी काही विशेष तपासण्या करण्याची गरज आहे. त्या तपासण्यांची सोय जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळेच अशा तपासण्यांची सुविधा असलेल्या रुग्णालयात त्यांना दाखल केले जाणार असल्याची माहिती जेजे हास्पिटलचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांनी दिली.

लहाने यांनी तुरुंग प्रशासनाला पत्रही लिहिले. पण, या संदर्भात कोणतेही पत्र मिळाले नसल्याचा दावा तुरंग प्रशासनाने केला होता.
बातम्या आणखी आहेत...