आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhagan Bhujbal\'s Sudden Admission To St George\'s Hospital Comes Under Scanner; Probe Ordered

समीर भुजबळांकडून 10 लाखांची लाच घेतली- जेल अधिका-याचे गंभीर आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माजी मंत्री छगन भुजबळ यांना दंतचिकित्सेसाठी बाह्योपचाराची परवानगी देणारे आणि त्यामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आर्थर रोड कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घुलेंनी ६ एप्रिल राेजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून तुरुंग अधीक्षक बी. एम. भोसलेंवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. अंडा सेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन भोसले बड्या राजकीय आरोपींकडून लाखो रुपये उकळतात. तसेच काही कैद्यांची तुरुंगात "शाही बडदास्त' ठेवली जाते, असा गाैप्यस्फाेटही केला.

भोसलेंच्या दबावामुळेच आपल्याला राजकीय कैद्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी खोटी वैद्यकीय प्रमाणपत्रे द्यावी लागतात, असा आरोपही डॉ. घुलेंनी केला आहे. कैद्यांकडून पैशाची मागणी करण्यासाठी आपल्यावरही भोसलेंनी दबाव टाकल्याचे घुलेंचे म्हणणे आहे. ‘तुरुंगातील गैरकारभाराचा लेखाजोखाच अापण सादर केल्यामुळे मला कुठल्या तरी प्रकरणात गोवण्याचा डाव आहे. गेले दोन दिवस तुरुंगाच्या प्रवेशद्वारावरच मला अडवून ठेवण्यात आले आहे,’ असेही त्यांचे म्हणणे अाहे.

पद गेल्याने बेछूट आरोप : भोसले
अधीक्षक भोसले यांनी मात्र घुले यांचे आरोप फेटाळले. ‘तुरुंग विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक बी. के. उपाध्याय हे तुरुंगात आले असताना पीटर मुखर्जी यांनीच घुलेंची तक्रार केली. त्यामुळे घुले यांना मुख्य वैद्यकीय पदावरून हटवण्यात आले. हा राग मनात धरून ते आरोप करीत आहेत,’ असे भाेसले म्हणाले.

पीटर मुखर्जी खरे सांगतील
तुरुंग अधीक्षकांनी पैसे मागायला सांगितले त्याच वेळी का नाही तक्रार केली? असा प्रश्न डाॅ. घुले यांना विचारला असता ते म्हणाले की, ‘त्या वेळी मी नुकताच त्या रुजू झालो असल्याने भोसले यांच्याविरोधात जाण्याची हिंमत नव्हती.

पैसे पाठविण्याचा निरोप भोसले यांनी दिला आहे एवढेच मी पीटरला सांगितले होते, आणि त्यांनीही भाेसले यांचीच तक्रार केली आहे. माझा फक्त संदर्भ दिला. मुखर्जीच खरे सांगतील. त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे.’
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, घुलेंनी केलेले गंभीर आरोप