आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhagan, Samir Bhujabal Custody Extended Till 27 April

छगन, समीर भुजबळांची काेठडी २७ पर्यंत वाढवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मनी लाँडरिंग व महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री व अामदार छगन भुजबळ, त्यांचा पुतणा व माजी खासदार समीर भुजबळ यांची न्यायालयीन काेठडी न्यायालयाने २७ एप्रिलपर्यंत वाढवली अाहे. १३ एप्रिल राेजी न्यायालयीन काेठडीची मुदत संपल्यामुळे या दाेघांना बुधवारी न्यायालयासमाेर हजर करण्यात अाले हाेते. सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या चाैकशीत भुजबळ काका-पुतण्यांकडून सहकार्य मिळत नसल्याने या दाेघांनाही अटक करण्यात अाली हाेती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही भुजबळांवर विविध गुन्ह्यांत सहभागाचे अाराेप ठेवले अाहेत.