आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे देशातील सर्वात मोठे विमानतळ, लंडन-सिंगापूरही यापूढे फिके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल-2 देशातील सर्वात मोठे टर्मिनल आणि पहिले चार मजली टर्मिनल आहे. याचे छत 42 मीटर उंच आहे, त्याला तयार करण्यासाठी 20 हजार टन स्टील लागले. या टर्मिनलचे वैशिष्ट्य म्हणजे यात 192 चेक पॉइंट, 60 इमीग्रेशन काऊंटर आणि 135 एक्झिट पॉइंट आहे. पार्किंग एरियात 5 हजार कारसाठीची व्यवस्था आहे. येथे व्यस्त वेळेतही प्रत्येक तासाला 42 विमान ये-जा करु शकतात.
का आले चर्चेत...
यूएईची एअरलाइन्स कंपनी एत्तिहादने मुबंई ते न्यूयॉर्कसाठी जगातील सर्वात महागडे फ्लाइट सुरु केले आहे. त्याचा किराया 25 लाख रुपये आहे. यानिमीत्ताने, ज्या मुंबई विमानतळावरुन हे फ्लाइट उड्डाण करणार आहे, त्या महाराष्टाच्या राजधानीतील या विमानतळाबद्दल आज divyamarathi.com येथे सांगत आहोत.
- मुंबईतील टर्मिनल दिल्लीतील प्रसिद्ध इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल -3 पेक्षा कितीतरी पटीने उच्च दर्जाचे आहे.
- लंडनमधील हिथ्रो आणि सिंगापूरच्या चांगी विमानतळांनाही याने क्षेत्रफळ आणि सुविधांबाबत पिछाडीवर टाकले आहे.
- या विमानतळाची क्षमता वर्षाला चार हजार कोटी प्रवाशांना सुविधा देण्याची आहे. याचे निर्माण जीव्हीके ग्रुपने केले आहे.

100 विमान पार्किंगची व्यवस्था
- या विमानतळावर 100 विमान पार्क करण्याची सुविधा आहे.
- त्यासोबतच पीक अवर्समध्ये 10 हजार प्रवाशी चेक इन आणि चेक आऊट करु शकतात.
- या टर्मिनलचा परिसर 4.39 लाख वर्गमीटर आहे.
- तर, लंडनचे हिथ्रो विमानतळ 3.53 लाक वर्ग मीटर परिसरात आहे आणि सिंगापूरचे चांगी विमानतळ 3.80 लाख वर्ग मीटरमध्ये तयार करण्यात आले आहे.
हॉटेलची सुविधा
- येथे 16 लाउंज , 11 हजार सीट्स, 10 लगेज ट्रान्सफर बेल्ट, 48 एस्केलेटर्स, 73 लिफ्ट, 25 लिंक ब्रीज आणि 52 बोर्डींग ब्रीज आहेत.
- त्यासोबत येथे एक डे हॉटेल आणि एक ट्रांझिट हॉटेलचीही व्यवस्था आहे.

आर्ट गॅलरी देखिल
- एअरपोर्टपर्यंत पोहोचण्यासाठी लागणार वेळ वाचवण्याकरीता 6 लेन एलिवेटेड रोडच्या माध्यमातून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने टर्मिनल-2 ला जोडण्यात आले आहे.
- या विमानतळाचा आकार हा इंग्रजी एक्स प्रमाणे आहे. त्यात तीन किलोमीटर लांब आर्ट गॅलरी आहे. यात देशाची संस्कृती आणि कलेशी संबंधीत सात हजारांहून अधिक पेंटिंग्ज आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जागतिक दर्जाचे महाराष्ट्राचा मानबिंदू ठरणाऱ्या एअरपोर्टचा नजारा
बातम्या आणखी आहेत...