आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट, गर्लफ्रेंड, पार्टीज, 93 च्‍या ब्लास्टपूर्वी असे जगत होते दाऊद-राजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्तुळात दाऊद आणि छोटा राजन. - Divya Marathi
वर्तुळात दाऊद आणि छोटा राजन.
मुंबई- 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर दाऊद आणि छोटा राजन यांच्‍यात संबंध ताणल्‍या गेल्‍या. याच कारणाने सख्‍खे मित्र असलेले हे दोघे आता एकमेकांचे पक्‍के वैरी झाले आहेत. मात्र, त्‍यानंतर या दोघांनीही देश सोडून पळ काढला. पण, मुंबईत असताना ते अगदी आलिशान आयुष्य जगत होते. क्रिकेट मॅच, गर्लफ्रेंड आणि पार्टीज त्‍यांच्या आयुष्याचा भाग होता. यातील छोटा राजनला अटक केल्‍याच्‍या पार्श्वभूमिवर आम्ही सांगत आहोत, दाऊद आणि त्‍याच्‍या लाइफशी निगडित काही फॅक्ट्स...
1993 नंतर मित्र झाले शत्रू
दाऊद आणि छोटा राजन कधी काळी सोबत काम करायचे. क्रिकेट मॅच असो किंवा पार्टीज दोघे सर्वच जागी सोबत दिसायचे. परंतु, बॉम्बस्फोटांनंतर दोघे एकमेकांचे कट्टर शत्रू झाले. दोघांच्या गँगमध्ये बऱ्याच वेळा गँगवॉर झाले. दोघांनी एकमेकांना ठार मारण्यासाठी शूटर्स पाठवले होते.
अभिनेत्रींना करायचे डेट
बॉम्बस्फोटांपूर्वी दाऊदचा बॉलिवूडमध्ये दबदबा होता. डायरेक्टर, प्रोड्युसर यांच्यापासून अॅक्टर-अॅक्ट्रेसेस दाऊदच्या पार्टीत दिसायचे. पाकिस्तानी अॅक्ट्रेस अनीत आयुब आणि मंदाकिनी दाऊदच्या गर्लफ्रेंड होत्या. मंदिकिनीसोबत तो अनेकदा क्रिकेटच्या मैदानावरही दिसला. दरम्‍यान, ममता कुलकर्णीसोबत छोटा राजनचे नाव जोडले गेले होते. त्‍याच्‍यामुळेच तिला सिनेमात काम मिळाल्‍याचे सांगितले जाते.
ममताच्‍या ब्वॉयफ्रेंडला अरेस्ट करायला लावले
ममता हिने बॉलीवूडला रामराम ठोकल्‍यानंतर ड्रग स्मगलर विक्की ऊर्फ विक्रम गोस्वामी याच्‍यासोबत लग्‍न केल्‍याचे वृत्‍त काही वर्षांपूर्वी आले होते. नंतर त्‍याचा खुलासा झाला की हे दोघे केनियामध्‍ये लिव इन रिलेशनशिपमध्‍ये आहेत. विक्रम गोस्वामी हा छोटा राजन याचा व्‍यवसाय संभाळत असल्‍याने दाऊदनेच त्‍याला अटक करायला लावले होते.
पुढील स्लाईडवर बघा, संबंधित फोटोज...