आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटा राजनला ठेवणार या तरुंगातील अंडा सेलमध्‍ये, ‘बॉम्बप्रूफ’ आहे हा भाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंडोनेशियातील बालीमध्‍ये अटकेत असलेल्‍या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला भारतात आणण्‍यासाठी सीबीआय आणि पोलिसांचे पथक इंडोनियात पोहोचले. राजन याला भारतात आणल्‍यानंतर नेमके कुठे ठेवणार या बाबत शासनाने गोपनीयता पाळली आहे. मात्र, त्‍याच्‍याविरुद्ध सर्वाधिक गुन्‍हे मुंबईमध्‍ये दाखल आहेत. त्‍यामुळे त्‍याला मुंबईतील आर्थर तरुंगातील अंडा सेलमध्‍ये ठेवले जावू शकते. त्‍या अनुषंगाने या ठिकाणी त्‍याच्‍या सुरक्षेसाठी पोलिस तयारीला लागले आहेत.
काय आहे अंडा सेल
मुंबईतील सर्वात मोठा तरुंग म्‍हणून आर्थर जेलचा उल्‍लेख होतो. या तरुंगातील सर्वाधिक सुरक्षित जागा म्‍हणजे अंडा सेल ही आहे. या सेलचा आकार अंड्यासारखा आहे त्‍यामुळे त्‍याला अंडा सेल म्‍हणतात. यामध्‍ये खूंखार कैद्यांना ठेवले जाते. सेलला पूर्णपणे ‘बॉम्बप्रूफ’ बनवले गेले आहे. आत अत्‍यंत अरुंद असलेल्‍या नऊ खोल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये वीज नाही. त्‍यामुळे कैद्यांना अंधारातच राहावे लागते. सेलच्‍या बाहेर इलेक्ट्रिक फेंसिंग असून, आत बाहेर असे दोन्‍हीकडे गार्ड्स तैनात आहेत.
कोण- कोण आहे अंडा सेलमध्‍ये
दहशतवादी अबू जिंदालला या जेलमध्‍ये ठेवले आहे. या शिवाय राजनचा निकटवर्तीय गँगस्टर डी.के. राव, पत्रकार जेडेचा मारेकरी सतीश कालिया, अबू सावंत यांना येथे डांबलेले आहे. एवढेच नाही गँगस्टर अबू सलेम आणि दहशतवादी अजमल कसाब यांनाही येथे ठेवले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा आर्थर जेलचे PHOTOS....