आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटा राजनची पत्नीही अंडरवर्ल्‍डमध्‍ये, लेडी डॉन म्‍हणून दबदबा, घाबरतात बिल्डर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुजाता आणि छोटा राजन यांच्‍या लग्‍नात  दाऊदसुद्धा आला होता. - Divya Marathi
सुजाता आणि छोटा राजन यांच्‍या लग्‍नात दाऊदसुद्धा आला होता.
मुंबई - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन ऊर्फ राजेंद्र सदाशिव निखळजे याला सोमवारी इंटरपोलने इंडोनेशियामध्‍ये अटक केली. त्याच्‍यावर खून, अपहरण, लूटमार, दरोडा असे अनेक गंभीर गुन्‍हे आहेत. दोन दशकांपासून तो पोलिसांना हुलकावणी देत होता. छोटा राजन याची पत्‍नी सुजाता ऊर्फ नानी, एक मुलगा आणि एक मुलगी अजूनही मुंबईतील चेबुंर परिसरामधील टिळकनगरात राहतात. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सुजाता हिला ताब्‍यात घेतले होते. एका बिल्‍डरला खंडणी मागितल्‍याचा आरोप तिच्‍यावर होता.
दाऊदही आला होता लग्‍नात
छोटा राजन आणि दाऊद यांच्‍यात एकेकाळी घनिष्‍ठ मैत्री होती. सुजाता आणि छोटा राजन यांच्‍या लग्‍नात दाऊदसुद्धा आला होता. सुजाता ही दाऊदला आपला भाऊ मानत होती.
सुजातावर खंडणीचे अनेक आरोप
छोटा राजन भारतातून पळून गेल्‍यानंतर सुजाता लाइमलाइटमध्‍ये आली. अंडरवर्ल्डमध्‍ये तिला नानी या नावाने ओळखतात. तिने खंडणी मागितल्‍याचे अनेक आरोप झाले. आजही तिच्‍या नावाने बड्या बड्या बिल्डर्संचा थरकाप उडतो.
मुंबईत चालणार केस
राजन याच्‍याविरुद्ध मुंबईमध्‍येच सर्वाधिक गुन्‍हे दाखल आहेत. त्‍यामुळे मुंबईमध्‍ये त्‍याच्‍या विरुद्ध खटला चालवला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. विशेष म्‍हणजे आयपीएस अधिकाऱ्यापासून आता वकिली करणारे वाय. पी. सिंह म्‍हणाले, "राजनची अटक महत्‍त्‍वपूर्ण आहे. अंडरवर्ल्ड-पोलिस-राजकारणी यांच्‍या संबंधाबाबत त्‍याच्‍याकडून अनेक गौप्‍यस्‍फोट होऊ शकतात,'' असे ते म्‍हणाले. दरम्‍यान, राजन याच्‍या अटकेतून काहीही साध्‍य होणार नाही, कारण अंडरवर्ल्डच्‍या हालचाली संपल्‍यात जमा आहेत. शिवाय राजन आता आजारी आणि खूप अशक्‍त आहे, त्‍यामुळे त्‍याच्‍या चौकशीतीतून फार काही मिळणार नाही, असा अंदाज माजी पोलिस आयुक्‍त एम. एन. सिंह यांनी व्‍यक्‍त केला.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज....