आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाचे पूर्ण पैसे देत नव्‍हता राजन, त्‍याचे नाराज साथीदार बनले शकीलचे खबरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंडोनेशियाच्‍या बालीमधून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला अटक करण्‍यात आली. या अटकेशी संबंधित विविध बाबी यानंतर पुढे यायला सुरूवात झाली आहे. राजनला त्‍याच्‍याच गँगमधील मेंबर्सने धोका दिला म्‍हणून तो पकडला गेला, अशीही माहिती समोर येत आहे. या लोकांनी छोटा शकील आणि दाऊद इब्राहिमला भेटून हा प्‍लॅन केल्‍याचे बोलले जात आहे. राजनला धोका देणा-यांमध्‍ये त्‍याच्‍यात गँगमधले तिघे आहेत. यामध्‍ये दोघे भाऊ रवि आणि विमल रात्‍तेसर यांच्‍यासह तिसरे नाव राजनचा कुक मितवाचे आहे. असेही बोलले जात आहे की, राजन त्‍याच्‍या मेंबर्सला कामाचा पूर्ण पगार देताना कंजूसी करत होता, अशी माहितीही समोर आली आहे.
विमल आणि रविने घेतला होता शेट्टीकडून बदला
बॅंकॉकमध्‍ये 2000 मध्‍ये छोटा राजनवर जिवघेणा हल्‍ला शरद शेट्टी नावाच्‍या व्‍यक्‍तीच्‍या घरात झाला होता. शेट्टी हा राजनचाच माणुस होता, पण त्‍याने शकीलशी हात मिळवणी केली होती. हल्‍ल्यानंतर विमल आणि रविने दुबईमध्‍ये शरद शेट्टीला मारले होते.
काय म्‍हणाला छोटा शकील ?
राजनच्‍या अटकेनंतर एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना शकील म्‍हणाला, “माझ्या मुलांनी मागच्‍या आठवड्यात फिजीमध्‍येच राजनचा पत्‍ता शोधला होता. त्‍याच्‍याकडे पर्याय नसल्‍याने तो इंडोनेशियाला पळाला. त्‍यामुळेच इंडोनेशियामध्‍ये तो पकडल्‍या गेला. पण, डी-कंपनी त्‍याच्‍या अटकेने खुश नाही. मला त्‍याचा खात्‍माच करायचा आहे. जोपर्यंत मी हे काम करणार नाही, तोपर्यंत मला चैन नाही.”
भारत सरकारवर शकिलचा विश्‍वास नाही
शकील म्‍हणाला की, “आम्‍ही भारत सरकारवर विश्‍वास ठेवत नाही. भारत सरकार राजनला आमच्‍या विरोधात वापरत आहे. या बाबीची कोणतीही हमी नाही की, त्‍याला शिक्षा सुणावण्‍यात येईल. त्‍याच्‍या अटकेचे आम्‍हाला काहीही देणेघेणे नाही. आमचा उद्देश पुर्णपणे साफ आहे की शत्रूचा खात्‍माच केला गेला पाहिजे. मी त्‍याला सोडणार नाही, तो कुठेही असो.”
शकीलने दिली होती जिवे मरण्‍याची धमकी
दूसरीकडे राजनचा दुश्मन असलेल्‍या दाउद इब्राहिमचा राइट हॅड छोटा शकीलने दावा केला की, राजनला आपल्‍यामुळेच अटक करण्‍यात आले. शकीलने सांगितले की, राजनच्‍या अटकेमुळे तो आनंदी नाही, तर त्‍याला मारण्‍यानंतरच त्‍याला चैन पडेल. एका इंग्रजी दैनिकांने सांगितले की, राजनला त्‍याच्‍याच गँगमेंबर्सने धोका दिला आहे. त्‍यामुळेच तो पकडल्‍या गेला.

दोन वेळा वाचला होता राजन
छोटा शकीलने 2000 मे राजनवर जिवघेणा हल्‍ला केला होता. राजन या हल्‍ल्यात गंभीर जखमी झाला होता. मात्र हॉस्‍पिटलमधून निसटण्‍यात तो यशस्‍वी ठरला होता. त्याच वर्षी जुलै महिन्‍यात छोटा शकीलने राजनवर हल्‍ल्याचा प्रयत्‍न केला. मात्र, यातुनही तो निसटला.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, या बाबी आल्‍या आहेत समोर..