आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएमओनेच हुकवली मेजवानी, स्नेहभोजन हुकल्याने चौकशीचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांसोबत स्नेहभोजनाची संधी नेमकी कुणामुळे हुकली याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासाठी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील अधिकारी जबाबदार असल्याचे खापर फोडले जात असले तरी हा घोटाळा मुंबईतील मुख्यमंत्री कार्यालयाच्या बेजबाबदारपणामुळे झाल्याचे स्पष्ट होत आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री आपल्याच कार्यालयातील व खास मर्जीतील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवतील का, की दिल्लीतील अधिकाऱ्याला बळीचा बकरा बनविले जाईल, हा प्रश्न विचारला जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयात प्रवीणसिंह परदेशी, प्रवीण दराडे, मिलिंद म्हैसकर असे ज्येष्ठ सनदी अधिकारी असतानाही ही गफलत कुणाकडून झाली, हा चर्चेचा विषय झाला आहे.
ओबामांच्या स्वागतार्थ २५ रोजी राष्ट्रपती भवनात ठेवलेल्या मेजवानीला २५० विशेष निमंत्रितांत मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या पत्नी यांचाही समावेश होता. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, मुंबईच्या खासदार पुनम महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांच्या जागा तर ओबामांच्या अगदी शेजारी आरक्षित होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. ओबामांच्या मेजवानीचे निमंत्रण १७ जानेवारीला महाराष्ट्र सदनाकडे आले. तरीही वेळेत मुख्यमंत्र्यांना पोहचू शकले नाही. या आमंत्रणाचा प्रवास कसा झाला याबाबतचे कागदपत्रही प्राप्त झाले आहेत.

सूत्रांनुसार, २६ रोजी अोबामांसोबतच्या चहापानासाठी मुख्यमंत्री हजर राहिले तेव्हा खासदार पूनम महाजन यांनी ‘कालच्या मेजवानीला विशेष आमंत्रित असतानाही आपण गैरहजर का राहिलात?’ असे त्यांना विचारले. यावर आपल्याला त्या निमंत्रण नसल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला. मात्र अधिक चौकशी केली असता या बाबींचा खुलासा झाला. आता िदल्लीच्या महाराष्ट्र सदनातील लोकेश चंद्र आणि आभा शुक्ला या अधिकारी दांपत्याला वाचवण्यासाठी कनिष्ठ अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे डाव अधिकाऱ्यांनी आखल्याची चर्चाही मंत्रालयात आहे.
२३तारखेलात पाेहाेचले निमंत्रण : १९रोजी महाराष्ट्र सदनातून सुरू झालेला निमंत्रणाचा प्रवास २३ रोजी संपला. २३ रोजी ३.४६ वाजता मुंबईच्या मुख्यमंत्री कार्यालयात निमंत्रण पोहोचल्याची नोंद टपाल खात्याच्या अधिकृत कागदपत्रांवर आहे. मग २३ रोजी निमंत्रण मिळूनही सीएमओने त्याची दखल का घेतली नाही असा प्रश्न पडतो. आमंत्रणाच्या मूळ प्रतीचे छायाचित्र दिव्य मराठीच्या हाती लागले असून, त्यानुसार २५ २६ अशा दोन्ही दिवसांचे आमंत्रण फडणवीस यांना होते.

यांचाही समावेश होता. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, मुंबईच्या खासदार पुनम महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांच्या जागा तर ओबामांच्या अगदी शेजारी आरक्षित होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. ओबामांच्या मेजवानीचे निमंत्रण १७ जानेवारीला महाराष्ट्र सदनाकडे आले. तरीही वेळेत मुख्यमंत्र्यांना पोहचू शकले नाही. या आमंत्रणाचा प्रवास कसा झाला याबाबतचे कागदपत्रही प्राप्त झाले आहेत.
सूत्रांनुसार, २६ रोजी अोबामांसोबतच्या चहापानासाठी मुख्यमंत्री हजर राहिले तेव्हा खासदार पूनम महाजन यांनी ‘कालच्या मेजवानीला विशेष आमंत्रित असतानाही आपण गैरहजर का राहिलात?’ असे त्यांना विचारले. यावर आपल्याला त्या निमंत्रण नसल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला. मात्र अधिक चौकशी केली असता या बाबींचा खुलासा झाला. आता िदल्लीच्या महाराष्ट्र सदनातील लोकेश चंद्र आणि आभा शुक्ला या अधिकारी दांपत्याला वाचवण्यासाठी एखाद्या कनिष्ठ अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे डाव अधिकाऱ्यांनी आखल्याची चर्चाही मंत्रालयात आहे.
23 तारखेलात पाेहाेचले निमंत्रण-
19 रोजी महाराष्ट्र सदनातून सुरू झालेला निमंत्रणाचा प्रवास २३ रोजी संपला. २३ रोजी ३.४६ वाजता मुंबईच्या मुख्यमंत्री कार्यालयात निमंत्रण पोहोचल्याची नोंद टपाल खात्याच्या अधिकृत कागदपत्रांवर आहे. मग २३ रोजी निमंत्रण मिळूनही सीएमओने त्याची दखल का घेतली नाही असा प्रश्न पडतो. आमंत्रणाच्या मूळ प्रतीचे छायाचित्र दिव्य मराठीच्या हाती लागले असून, त्यानुसार २५ व २६ अशा दोन्ही दिवसांचे आमंत्रण फडणवीस यांना होते.

निमंत्रण स्पीड पोस्टने पाठवले
राज्य व केंद्रातील सरकार वेगवान प्रशासनाचे गोडवे सुरू असताना अधिकारी लेटलतिफ कारभारात अडकले आहेत. मेजवानीच्या निमंत्रणाबाबत मुख्यमंत्र्यांना काहीही न कळवता महाराष्ट्र सदनातल्या अधिकाऱ्यांनी हे निमंत्रण चक्क स्पीड पोस्टाने पाठवले.

फोन का केला नाही : मुख्यमंत्री
अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे स्नेहभाेजनाची आयुष्यभर लक्षात राहिल अशी संधी हुकल्याने मुख्यमंत्री नाराज असून त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आपण स्पीडपोस्ट ऐवजी मला थेट फोन का केला नाही? या मुख्यमंत्र्याच्या प्रश्नाचे कोणत्याही अधिकाऱ्यांकडे काहीच उत्तर नाही.