आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minister Bends Before The Citizen; Estern Express Free Way Starts Thursday

जनतेच्या रेट्यापुढे मुख्यमंत्री झुकले; सुरू झाला \'ईस्टर्न फ्री वे\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दक्षिण मुंबई ते पूर्व उपनगरांना जोडणारा ईस्टर्न एक्स्प्रेस फ्री वे मे महिन्यात सुरू होणार होता, परंतु केंद्रीय नेत्यांच्या हस्तेच उद्घाटन करण्याचा हट्ट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी धरल्याने हे उद्घाटन रखडले होते. पावसाने मुंबईकरांची त्रेधा तिरपीट उडवल्यानंतर हा मार्ग लवकर खुला करावा, अशी मागणी जोर धरू लागताच मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी या मार्गाचे उद्घाटन करण्याचे ठरवले आहे. हा रस्ता जर सुरू झाला असता तर रविवारी आणि सोमवारी पडलेल्या पावसात मुंबईकरांना ट्रॅफिकमध्ये अडकावे लागले नसते.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवून त्यांनीच आता या रस्त्याचे उद्घाटन करावे अशी मागणी केली होती. मुंबईकरांमधील नाराजी पाहून अखेर मंगळवारी चव्हाण यांनी या रस्त्याचे गुरुवारी उद्घाटन करण्याचे ठरवले आहे. पूर्व मुक्त मार्ग खुला झाल्यास दक्षिण मुंबईहून पूर्व उपनगरांकडे आणि नवी मुंबई, पनवेल, पुणे आणि गोव्याकडे जाणा-या प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.