आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांच्या सन्मानाने समाजाला प्रेरणा मिळेल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देऊन त्यावर मात करणाऱ्या यशस्वी महिलांच्या सन्मानाने समाजाला प्रेरणा मिळते. ‘सावित्री सन्मान’ सारख्या महत्त्वाच्या पुरस्काराने अशा महिलांना नक्कीच बळ मिळेल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे गुरुवारी महाराष्ट्र वन ‘सावित्री सन्मान-२०१६’ या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ संपादक निखिल वागळे, डॉ. रूपाताई कुलकर्णी, अपना बँकेचे संचालक दत्तात्रय चाळके आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रा. पुष्पा भावे यांना ‘सावित्री सन्मान जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या वाघापूर (ता. पुरंदर) येथील मनीषा कुंजीर, साहित्य क्षेत्रासाठी कवयित्री कल्पना दुधाळ, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. अर्चना पै, प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्याच्या न्यायिक आणि तांत्रिक विभागाच्या महासंचालक डॉ. मीरा बोरवणकर, मुंबई येथे महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या ‘राइट टू पी’ या संस्थेच्या महिलांचाही ‘सावित्री सन्मान’ पुरस्काराने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘राज्य सरकारने समाजामध्ये स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. मात्र त्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. महिला स्वतंत्रपणे व निर्धाराने कुटुंबाच्या बाजूने उभ्या राहतात, या जाणिवेतूनच अशा घटना संपतील.’