आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minister Happy On Budget ; Finanace Minister Also Mix His Sound With Its

मुख्‍यमंत्री अर्थसंकल्पावर समाधानी ; दादा म्हणतात 25 टक्‍के तरतूद दुष्‍काळनिवारणासाठी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडलेल्या अर्थसंकल्पातून समतोल साधण्यात आला आहे. सामान्य माणसावर कोणताही बोजा पडणार नाही याची काळजी त्यात घेण्‍यात आली आहे. राज्यातील दुष्‍काळ निवारणासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्‍यात आल्याचे राज्याचे मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्हाण यांनी सांगितले.

विधानसभेत अर्थसंकल्प मांडल्यानंतर उपमुख्‍यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याबरोबर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. अजित पवार पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना म्हणाले, यंदा महाराष्‍टावर दुष्‍काळचे सावट आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात एकूण तरतूदीपैकी 25 टक्के निधी पिण्‍याचे पाणी जलसिंचन व शहापूर पॅटर्न राज्यभर राबविण्‍यासाठी करण्‍यात आला आहे. कर भरण्याची क्षमता असलेल्या वर्गावरच कर लादण्यात आला आहे. राज्याचा हा अर्थसंकल्प 184 कोटींपेक्षा अधिक शिलकीचा आहे. शासनाला संसाधने मिळवून देणा-या विभागांची गळती थांबवण्‍यासाठी पावले उचलण्‍यात आल्याची माहिती पवार यांनी दिली. आमदारांनी पोलिस निरीक्षकाला केलेल्या मारहाणीवर मुख्यमंत्री व उपमुख्‍यमंत्री यांनी बोलण्‍यास नकार दिला.