आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, रतन टाटा उपस्थित राहणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई - महाराष्ट्रदिनी प्रथमच राज्यातील विद्यार्थ्यांसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधणार असून “व्हिजन महाराष्ट्र २०२५’ संबंधित माहिती देणार आहेत. २०२५ पर्यंत राज्यात कोणते प्रकल्प राबवले जाणार आहेत. यामुळे जनतेला कसा फायदा होणार आहे, याची माहिती ते विद्यार्थ्यांना देतील. यासाठी राज्यभरातील पाच हजार विद्यार्थी उपस्थित राहणार असून अनेक उद्योगपतीही या कार्यक्रमाला उपस्थित असतील.    

 
मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र कार्यक्रमाची गेल्या वर्षी सुरुवात करण्यात आली होती. आयआयटीच्या विद्यार्थ्यांसमोर याबाबतचे सादरीकरण करण्यात आले होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत योजना सादर करण्याचे आवाहन केले होते. या ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र कार्यक्रमाचा समापन सोहळा एक मे रोजी वरळी येथील एनएसआयमध्ये आयोजित करण्यात आला आहे.  ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र ही राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती. यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्रातील ११ सामाजिक-आर्थिक समस्या जसे दुष्काळ, भ्रष्टाचार, गरिबी यांवर मात करण्यासाठी उपाय, कल्पना सुचवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमातून दुहेरी उद्दिष्ट साधण्याचे लक्ष्य होते - एक म्हणजे महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी विविध कल्पक उपाय सुचवणे आणि दुसरे म्हणजे शासकीय धोरणांमध्ये युवकांचा सहभाग वाढवणे. या स्पर्धेत राज्यभरातील ११,५०० विद्यार्थ्यांकडून २५०० सूचना आल्या तसेच तब्बल ६ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. संबंधित तज्ज्ञ व ऑनलाइन मतदान याद्वारे सर्वोत्तम उपाय निवडण्यात आले आहेत. ऑनलाइन मतदानात तब्बल सहा लाख जणांनी आपली मते नोंदवली.   
 
रतन टाटा उपस्थित राहणार  
समापन सोहळ्यात विजेते आपल्या कल्पना मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत. या कार्यक्रमाला प्रख्यात उद्योगपती रतन टाटा, मेजर जनरल अनुज माथुर, ओला कॅबचे संस्थापक भाविश अग्रवाल उपस्थित राहणार असून गायक केकेचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील जे विद्यार्थी स्पर्धेत भाग घेऊ शकले नव्हते त्यांनाही या वेळी त्यांच्या कल्पना सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.
 
बातम्या आणखी आहेत...