आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minister, Kshirsagar Indefference Barred Sea Link, Coastal Road

मुख्यमंत्री, क्षीरसागरांच्या वादात अडले सी लिंक, कोस्टल रोड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यातील वादामुळे सी लिंक आणि कोस्टल रोडचे घोडे अडले असून मुंबईकरांना नक्की कोणती सुविधा आणि कधी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सी लिंकची किंमत जास्त असल्यामुळे मुंबईच्या वाहतूक समस्येवर कोस्टल रोडची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्तावित सी लिंकचा वरळी ते हाजीअली हा दुसरा टप्पा आणि वांद्रे-वर्सोवा सी लिंक हा टप्पा रद्द करणे अपेक्षित होते, पण तसे न केल्यामुळे व कोस्टल रोडलाही अद्याप केंद्राने परवानगी न दिल्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे.


वांद्रे-हाजी अली सी लिंक अनेक वर्षे रखडला व पर्यायाने त्याची किंमत प्रचंड वाढली. त्यामुळे सीलिंक ऐवजी कमी खर्चिक असा कोस्टल रोड बांधण्याचा पर्याय मुख्यमंत्र्यांनी मांडला आणि त्यावर प्रस्ताव बनवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाऐवजी महानगरपालिकेला दिले.तोपर्यंत वरळी-हाजी अली सी लिंकचे काम रिलायन्सला देण्यात आले होते. पण कोस्टल रोडची घोषणा झाल्याने रिलायन्सने कामातून माघार घेतली. तरीही तांत्रिकदृष्ट्या हे काम रद्द झालेले नाही.