आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minister Relief Fund Than Nam Deposit More Funds

मुख्यमंत्री मदत निधीपेक्षा ‘नाम’कडे जास्त निधी जमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सरकार आपल्याला संकटात मदत करील, या आशेने नागरिक निवडणुकीत सजग नेतृत्वाला निवडूण देतात. सरकार घोषणाही करते; परंतु घोषणांची अंमलबजावणी होत नाही आणि झाली तरी झिरपत झिरपतच शेवटच्या स्तरावरील नागरिकांपर्यंत मदत पोहोचते. कदाचित त्यामुळे नागरिकांचा सरकारवरील विश्वास उडतो आणि समाजभान असणाऱ्यांच्या पाठीशी तो उभा राहतो. चित्रपट अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनबाबतही असेच घडले आहे. केवळ १५ दिवसांतच नाम फाउंडेशनने लोकांनी दुष्काळग्रस्तांसाठी जवळजवळ सहा कोटी रुपये जमा केले आहेत तर मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्त शिवार निधी आणि मुख्यमंत्री मदत निधीत दुष्काळासाठी फक्त पाच कोटी रुपये जमा झाले आहेत.
दुष्काळग्रस्तांची अवस्था पाहून मकरंद मदतीसाठी पुढे आला आणि स्वतःच्या खिशातील पैसे टाकून त्याने नाना पाटेकरसोबत मदतीस सुरुवात केली. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी नाम फाऊंडेशनची स्थापना केली. आज या फाऊंडेशनच्या खात्यात सुमारे सहा कोटी रुपये जमा झाले आहेत. विशेष म्हणजे चहावाला ते सफाई कर्मचारी आणि महिला पोलिसांच्या व्हॉट्स अप ग्रुपपासून उद्योगपतींपर्यंत अनेकांनी आपल्या कुवतीप्रमाणे ही मदत केलेली आहे. सरकारपेक्षा नाना आणि मकरंदच आम्हाला जास्त मदत करीत असल्याची भावना बीड आणि उस्मानाबादमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी दौऱ्याच्या वेळेस प्रस्तुत प्रतिनिधीकडे बोलून दाखवली होती.

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवारसाठी नागरिकांनी मदत करावी असे आवाहन केले. २२ जुलै या त्यांच्या वाढदिवशी फलक न लावता त्याचे पैसे या निधीसाठी द्यावेत असे म्हटले होते. त्यानुसार त्यांच्याकडे मदतीचा ओघ सुरु झाला. एमसीएचआयने दीड कोटी रुपये दिले. काही आमदार, खासदारांनी वेतनासह आर्थिक मदत केली. परंतु ही रक्कम चार कोटींच्या वर गेली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीत साधारणतः आणखी एक कोटी रुपये दुष्काळग्रस्तांसाठी मदत म्हणून जमा झाल्याचे समजते. म्हणजेच सरकारच्या मदत निधीपेक्षा ‘नाम’वर नागरिकांनी जास्त विश्वास दाखवल्याचेच स्पष्ट होते.

नाम फाऊंडेशन आणि मुख्यमंत्री मदत निधी व जलयुक्त शिवार योजना मदत निधीची तुलनाच करणे चुकीचे आहे. राज्य सरकारने एक हजार कोटी रुपये दिले आहेत तर लोकसहभागातून ३०० कोटी रुपये जलयुक्त शिवारसाठी गोळा झाले आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांना लाचार करण्यापेक्षा त्यांच्यासाठी शाश्वत उपाययोजना करणे आवश्यक आहे. जलयुक्त शिवारचे परिणाम काही वर्षानंतर दिसतील. शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
फक्त पाच कोटी रुपये जमा झाले आहेत.दुष्काळग्रस्तांची अवस्था पाहून मकरंद मदतीसाठी पुढे आला आणि स्वतःच्या खिशातील पैसे टाकून त्याने नाना पाटेकरसोबत मदतीस सुरुवात केली. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी नाम फाऊंडेशनची स्थापना केली. आज या फाऊंडेशनच्या खात्यात सुमारे सहा कोटी रुपये जमा झाले आहेत. विशेष म्हणजे चहावाला ते सफाई कर्मचारी आणि महिला पोलिसांच्या व्हॉट्स अप ग्रुपपासून उद्योगपतींपर्यंत अनेकांनी आपल्या कुवतीप्रमाणे ही मदत केलेली आहे. सरकारपेक्षा नाना आणि मकरंदच आम्हाला जास्त मदत करीत असल्याची भावना बीड आणि उस्मानाबादमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी दौऱ्याच्या वेळेस प्रस्तुत प्रतिनिधीकडे बोलून दाखवली होती.
धोंदलगाव दत्तक
आमचाही शाश्वत उपायांवरच भर आहे. शेतकऱ्यांची पाण्याची समस्या कशी सुटेल, याचा विचार करून त्या दृष्टीने योजना आखू. आम्ही गावेही दत्तक घेणार आहोत. औरंगाबाद जिल्ह्यातील धोंदलगाव आम्ही दत्तक घेतले असून २ ऑक्टोबरला तेथे नानांची सभाही आहे, असे मकरंद म्हणाला.