आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chief Minister Say, Maharashtra First In Foreign Investment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री म्हणतात, विदेशी गुंतवणुकीत महाराष्‍ट्र अव्वलच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशात थेट परदेशी गुंतवणुकीचे जे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत त्यात सर्वाधिक प्रस्ताव महाराष्ट्रातील असून मोठे प्रकल्प, विशेष आर्थिक क्षेत्रातही देशात राज्याचा अग्रक्रम आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी दिली.


फिक्कीच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या बैठकीत चव्हाण यांनी राज्यातील औद्योगिक विकासाच्या आराखड्याबाबत माहिती दिली. राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, राजीव गांधी जीवनदायी योजना, लाभार्थीला थेट अनुदान या योजनांची यशस्वी अंमलबजावणी सुरू असल्याचे ते म्हणाले. नवीन औद्योगिक धोरणात मागास भागातील गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी मध्यम व लघुउद्योगांना अनेक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रोजगार निर्मितीत निश्चितच वाढ होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आगामी पाच वर्षांत राज्यात 389 विशाल प्रकल्पांद्वारे 3 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून 3 लाख 50 हजार रोजगार निर्मितीची शक्यता असल्याचे चव्हाण म्हणाले.