आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minister Should Be Give Wadala Flat To The Government

मुख्यमंत्र्यांनी वडाळ्यातील सदनिका सरकारकडे जमा करावे, विनोद तावडे यांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली वडाळ्यातील सदनिका सरकारजमा करावी, यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.


आईच्या उपचारांसाठी मुंबईत राहण्याची सोय व्हावी यासाठी 2003 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून वडाळ्यातील भक्ती पार्क येथे एक हजार चौरस फुटांची सदनिका त्यांना मंजूर करण्यात आली होती. प्रेमलाकाकींचे निधन झाल्यानंतर खासदार कोट्यातून ही सदनिका चव्हाण यांचे नावे करण्यात आली. परंतु राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना संपत्ती जाहीर करतेवेळी चव्हाण यांनी अर्जात या सदनिकेचा उल्लेख केला नाही. त्यावरून उद्भवलेल्या वादावर पडदा टाकताना ही सदनिका सरकारजमा करण्याचे चव्हाण यांनी जाहीर केले होते, परंतु दरम्यानच्या काळात त्यावर काहीही कार्यवाही झाली नसल्याचे ते म्हणाले.


तसेच सरकारकडून एकापेक्षा अधिक सदनिका मिळवून ती भाड्याने देऊन उत्पन्न खिशात टाकणा-या अधिका-यांच्या सदनिका ताब्यात घेऊन त्या गरजू अधिका-यांना देण्याची मागणीही त्यांनी केली. या सदनिकांच्या भाड्यातून अधिकारी वर्षागणिक किमान 100 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत, असा आरोपही तावडे यांनी केला.