आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री हे ‘रेडिअो जॉकी’सारखेच रेटून बाेलतात ! राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शेरेबाजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - “बाण आणि बाणा म्यान केलेल्या शिवसेनेची सत्तेसाठीची लाचारी परवडणारी नाही. ‘तो मी नव्हेच’ या नाटकातल्या ‘लखोबा लोखंडे’च्या भूमिकेत शिवसेना आहे. राज्यातल्या सर्व मंत्र्यांनी आपलाही ‘नाथाभाऊ’ होणार का याचा धसका घेतला आहे. मुख्यमंत्री सरकार चालवत नसून रेडिअोचे एफएम चॅनल चालवत आहेत; रेडिअो जॉकीसारखे ते रेटून बोलतात,’ अशी टाेलेबाजी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी केली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विखेंनी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. मुंबईसह राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींची डबघाईला आलेली आर्थिक स्थिती, भ्रष्टाचार आदींची चर्चा या प्रस्तावात होती. मात्र केवळ राजकीय शेरेबाजी आणि फिल्मी संवाद बोलून दाखवण्यात विखेंचे भाषण हरवून गेले.
ईडी लगायले : ‘आपला वाघ अभी पहले जैसा डरकाळी क्यों नही फोडता,’ अशी चर्चा मुंबईत सुरू झाली आहे. त्यामागे ‘ओंकारा’ चित्रपटातील ‘बीडी जलाईले’ या गाण्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांचे ‘ईडी (सक्तवसुली संचालनालय) लगायले’ हे धोरण कारणीभूत असल्याची कोपरखळी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी मारली. मुंबई महापालिकेतील सर्व भ्रष्टाचाराच्या चौकशा आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी पूर्ण कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
“३६ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेचे गेल्या सात वर्षात ऑडिटसुद्धा झालेले नाही,’ याकडे राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष वेधले. “गेल्या बारा वर्षात बिल्डरांना २३ हजार कोटींचा एफएसआय वाटला गेला. या सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावावी,” अशी मागणी भाजपाच्या आशिष शेलार यांनी केली. शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी मुंबईच्या दुरवस्थेबद्दल ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ला जबाबदार धरले.
पुढे वाचा...
“मेरे पास सबूत है, सच्चाई है. तुम्हारे पास क्या है?