आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान टर्नबुल यांच्याशी चर्चा; समृद्धी प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्याची विनंती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत सध्या भारत भेटीवर आलेले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांची राजभवनात भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
 
 
या वेळी टर्नबुल यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, विकास यासह अनेक विषयांवर माहिती घेतली. भारत तसेच ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय व्यापार आता २० अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. यापुढेही व्यापार वृद्धिंगत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतातील अनेक विद्यार्थी ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांत शिक्षण घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 
गुंतवणूक करण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती
मुंबई- नागपूर महामार्ग हा ७०० किमी लांबीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला असून त्यासाठी ६ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित आहे. या महामार्गामुळे राज्याचा ७० टक्के प्रदेश थेट जवाहरलाल नेहरू बंदराशी जोडला जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र ऑस्ट्रेलियाशी क्रीडा क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...