आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री उद्या देणार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आराखडा, नवीन विद्यापीठ कायद्यातील सुधारणा, ॲप्रेंटिसशिप कायद्यातील बदलामुळे रोजगाराच्या उपलब्ध होणाऱ्या संधी अशा विविध विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमाचा दुसरा भाग २८ मे रोजी सकाळी १०.३०  वाजता सह्याद्री वाहिनीवर प्रसारित हाेणार अाहे. सह्याद्री दूरदर्शनवर या कार्यक्रमाचे पुन:प्रसारण २९ मे रोजी संध्याकाळी ५.३० वाजता होणार आहे.

आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या दिलखुलास या कार्यक्रमातही ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. सोमवार आणि मंगळवारी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रावर हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.
सध्याच्या शिक्षण पद्धतीतले १० +२ + ३ हे असलेले सूत्र, आगामी काळात शिक्षणामध्ये होणारे बदल याबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री सविस्तर उत्तरे देणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...