आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chief Minister Today Discuss With All Parties Mp Eve Of Uninion Budget

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्रीय अर्थसंकल्पाच्‍या पार्श्‍वभूमीवर आज सर्वपक्षीय खासदारांशी मुख्‍यमंत्र्यांची चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील सर्व खासदारांची एक बैठक गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील 50 विषयांवर चर्चा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संसदेच्या प्रत्येक अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री राज्यातील खासदारांबरोबर बैठक घेऊन राज्याच्या समस्या केंद्राकडे कशा आक्रमक पद्धतीने मांडता येतील यावर चर्चा करतात. गेल्या वर्षी 28 फेब्रुवारी रोजी अशी बैठक आयोजित करण्यात आली होती, परंतु त्या वेळी खासदारांचा विशेष प्रतिसाद मिळाला नव्हता. गेल्या वर्षी 66 पैकी फक्त 32 खासदारांनीच बैठकीला हजेरी लावली होती.

सीमाप्रश्नाबाबत अपेक्षा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारच्या बैठकीत दुष्काळाबाबत महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. राज्यात अपूर्ण असलेले काही प्रकल्प आणि पायाभूत सुविधांना अडचणीच्या ठरणा-या कायद्यांबाबतही चर्चा केली जाणार आहे.रखडले मुंबईचे सहा रेल्वे प्रकल्प, ब्रिम्स्टोवॅड प्रकल्प, प्राध्यापकांना सहावा वेतन आयोग लागू केल्यानंतर केंद्र सरकारकडून येणारे 1500 कोटी रुपयांचे अनुदान लवकरात लवकर मिळवण्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्याची रणनीती बैठकीत आखली जाईल. सीमाप्रश्न लवकर सोडवावा यासाठी पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवले आहे. हा विषयही खासदारांनी संसदेत लावून धरावा, अशी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा आहे.

पायाभूत सुविधांवर चर्चा शक्य
पायाभूत सुविधांच्या समस्यांबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. नवीन मुंबई ते नरिमन पॉइंटदरम्यान हेलिपोर्ट, मुंबईतील उंच इमारतींच्या मर्यादेबाबतचा नियम शिथिल करणे, रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी गाडगीळ समितीने दिलेल्या अहवालातील नियम शिथिल करणे, राज्यातील अपूर्ण चौपदरी रस्ते पूर्ण करण्याबाबत केंद्राकडून आर्थिक मदत उपलब्ध प्राप्त करणे आदी विषयांवरही चर्चा केली जाणार आहे.

लॉबिंग करण्यात अपयश
प्रलंबित असलेली कामे मंजूर करून घेण्यासाठी महाराष्‍ट्रा तील केंद्रीय मंत्री व खासदार केंद्र सरकारवर दबाव टाकण्यात कमी पडतात. योग्य लॉबिंग होत नाही, त्यामुळे राज्याच्या वाट्याला काही येत नाही, अशी खंत गेल्या वेळी काही खासदारांनी बैठकीत बोलून दाखवली होती. तर या एक वर्षात मंत्री आणि खासदार केंद्रात लॉबिंग करण्यात किती यशस्वी झाले ते गुरुवारच्या बैठकीत कळेल, असेही सूत्रांनी सांगितले.