आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशविघातक प्रवृत्तींना रोखण्यासाठी नागरिकांनी सजग राहण्याची गरज; मुख्यमंत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील कामा रुग्णालयात परिचारिकांनी तर मुख्यमंत्र्यांनी जिमखाना येथे आदरांजली वाहिली. - Divya Marathi
मुंबईतील कामा रुग्णालयात परिचारिकांनी तर मुख्यमंत्र्यांनी जिमखाना येथे आदरांजली वाहिली.

मुंबई- जगात सातत्याने दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडत आहेत. या घटना रोखण्यासाठी पोलिस किंवा सैन्याच्या सुरक्षेवर अवलंबून न राहता देशातील प्रत्येक नागरिकाने सजग राहण्याची आवश्यकता आहे. देशविघातक प्रवृत्तींना रोखण्यासाठी तसेच सुरक्षा बळकट करण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षा यंत्रणांना सहकार्य केले तरच ती दहशतवादी हल्ल्यातील जवानांना खरी आदरांजली ठरेल, असे अावाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.   


२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ सीमा सुरक्षा दलाच्या वतीने आयोजित दिव्यांगांच्या मोटार आणि सायकल रॅलीचा समारोप रविवारी सकाळी गेटवे ऑफ इंडिया येथे पार पडला. त्या वेळी फडणवीस बोलत होते.  दहशतवादी घटनांना रोखण्यासाठी मजबूत सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून मुंबईत फोर्स वनसारख्या सुरक्षा यंत्रणेबरोबरच सीसीटीव्ही यंत्रणाही बसवण्यात आली आहे. तसेच आधुनिक सुरक्षा सामग्रीही सुरक्षा दलांना देण्यात आली आहे.  सीमा सुरक्षा दल, एनएसजी, फोर्स वन आणि अर्धसैनिक दलासारख्या सुरक्षा यंत्रणा सज्ज असून देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची क्षमता जवानांमुळे आपल्याकडे आहे. त्यामुळेच डोकलाममधील सैन्यांच्या कारवाईनंतर भारत हा कमजोर नसून मजबूत देश असल्याचे जगाला दिसून आले आहे. या देशाला मजबूत बनवण्याचे श्रेय या सैन्यातील जवानांना असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  


 अहिर म्हणाले,  सुरक्षेसंदर्भात उल्लेखनीय कार्य होत आहे. नक्षली कारवायांचे प्रमाण २० ते २२ टक्क्यांनी कमी झाले आहे. राज्य सरकारने सुरक्षेसंदर्भात समुद्रीमार्गावरील सुरक्षेत कडक पावले उचलली असून डिजिटल व सायबर सुरक्षेसंदर्भातील चांगले काम केले आहे. 

 

दिव्यांगत्व मनाने येते, शरीराने नव्हे

कारवायांदरम्यान दिव्यांगत्व आलेल्या बीएसएफ जवान या रॅलीत सहभागी झाले. मात्र, दिव्यांगत्व हे मनाने येते शरीराने नव्हे, हे ठासून सांगत दिले असून आपण आजही मनाने खंबीर असल्याचे  या जवानांनी सिद्ध केल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. रॅलीत सहभागी कॉन्स्टेबल लाला आणि हरेंदर यांचा त्यांनी सत्कार केला. दिल्लीच्या इंडिया गेट येथून १४ नोव्हेंबर रोजी बीएसएफच्या या रॅलीला सुरुवात झाली होती. देशभरात सुमारे १४०० किलोमीटरचा प्रवास करून ही रॅली गेटवे आॅफ इंडिया येथे आली.  

 

नक्षली कारवायांचे प्रमाण घटले  
देशातील नक्षली कारवायांचे प्रमाण घटले अाहे. जवानांना नवीन बनावटीची सर्वोत्तम उपकरणे, आधुनिक तंत्रज्ञान उपलब्धतेसाठी आवश्यक निधी केंद्रामार्फत कमी पडू दिला जात नाही, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री अहिर यांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...