आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Xclusive : वाचा, मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाच्या आठवणी, सांगतेय त्यांची आई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची आई सरिता फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या चाहत्यांना आणि पक्षाच्या कार्यकत्यांना वाढदिवसानिमीत्ताने विशेष कार्यक्रमांचं आयोजन करू नये असं सांगितलंय. आपल्या वाढदिवसाला जंगी पार्ट्या देणा-या आणि खासगीत विशेष कार्यक्रमांचं आयोजन करणा-या नेत्यांच्या जमान्यात मुख्यमंत्र्यांचा हा ‘धोरणी निर्णय’ असल्याचं अनेकजणं म्हणत असले, तरीही त्यांची आई सरिता फडणवीस मात्र आपल्या मुलाची ही लहानपणापासूनची सवय असल्याचेच सांगते.
त्या म्हणतात,” देवेंद्रने कधीच वाढदिवसाच्या पार्ट्या केल्या नाहीत. वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याची आमच्या घरात पध्दत आहे. वाढदिवसाला मी त्याच औक्षण करतें. आणि ताटात त्याच्या इतर आवडीच्या पदार्थांसोबतच खव्याचे गुलाबजाम असतात.हाच काय तो वाढदिवस. आज तो मुखअयमंत्री झालाय. पण नागपूरात असतानाही, जेव्हा तो पक्षाचा कार्यकर्ता आणि नंतर मत्री असतानाही तो कार्यकत्यांना आणि पत्रकारांना सक्त ताकिद द्यायचा, की माझ्या वाढदिवसाविषयी काहीही वर्तमानपत्रात तुम्ही लिहीता कामा नये. पण आमचे जवळचे नातेवाईक आणि त्याचे शाळेतली किंवा कॉलेजमधले मित्रमंडळी मात्र न बोलवता उत्साहात त्याचा वाढदिवस साजरा करायला येतातच. पूर्वी त्याच्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात आजच्या सराख्या वाढदिवसाच्या पार्ट्यांचीही फॅशन आली नव्हती. गिफ्ट्स आणि रिर्टन गिफ्ट्स माहित नव्हते.”
मुख्यमंत्र्यांची मुलगी दिविजा आता सहा वर्षांची आहे. देवेंद्र फडणवीस तिच्याच वयाचे असतानाची एक आठवण त्यांची आई सांगते,” त्याला आम्ही इंदिरा कॉन्व्हेंन्ट स्कुलमध्ये टाकलं होतं. पण त्याकाळी इंदिरा गांधींबाबत त्याने बाहेरच्यांकडून वाईट ऐकलंय. आणि त्याला कोणीतरी इंदिरा गांधींमुळेच तुझ्या बाबांना तुरूंगवास भोगावा लागतोय, हे सांगितलं. आणि मग त्याने हट्टच केला, ज्यांनी बाबांना जेलमध्ये टाकले, त्या इंदिरा गांधीच्या नांवाच्या शाळेत मी नाही जाणार.10-15 दिवस तो हट्टाला पेटून शाळेत गेलाच नाही. शेवटी मला त्याला सरस्वती विद्यालयात टाकणं भाग पडलं. लहानपणापासूनच तो वेगळा होता. आणि आता ते महाराष्ट्रालाही पटलंय.”
(सर्व फोटो- अजित रेडेकर)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीचे फोटो