आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minister's Office Paying Nearly Rs 8 Lakh A Month

सीएमअाेत बाहेरच्यांवर वर्षभरात ९० लाख खर्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) ‘तज्ज्ञांच्या नियुक्त्या’ म्हणून शासकीय सेवेत नसलेल्या ८ जणांची नियुक्ती केली आहे. त्यापोटी राज्य सरकारला दरवर्षी ९० लाखांहून अधिकचा बोजा सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, प्रशासकीय सेवेत व्यवस्थापन, अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ असतानाही या नियुक्त्या झालेल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यावर राज्याच्या प्रशासकीय कामात मदतीसाठी ‘ऑफिसर्स ऑन स्पेशल ड्यूटी’ म्हणजेच ओएसडींची नियुक्ती केली. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवली. त्यानुसार सीएमओत ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ या पदांवर नेमलेल्या ८ जणांवर दरमहा ७ लाख ६९,१०८ म्हणजेच वार्षिक ९२ लाख २९,२९६ रुपये खर्च होत असल्याचे समोर आले आहे. गलगली यांनी सरकारकडे सीएमओ ओएसडींना मिळणाऱ्या एकूण वेतनाची माहिती मागितली होती. मात्र, ती मिळाल्याने अपील दाखल केले.

सीएमओनेआरोप फेटाळले : यापूर्वीच्या सरकारमध्येही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्र्यांकडे खासगी व्यक्ती कार्यरत हाेत्या. मूळ महाराष्ट्र मिनिस्टर्स अँड अलाऊंस अॅक्ट १९५६ मधील कलम १० सीमध्ये तशी तरतूद अाहे. त्याच अनुषंगाने या नियुक्त्या केल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले. ओएसडींच्या वेतनाचे नियम यापूर्वीच्या सरकारने डिसेंबर २०१० रोजी तयार केले होते. मुख्यमंत्री कार्यालयाच्या आस्थापनेवर एकूण मंजूर पदांमध्येच ओएसडींच्या नियुक्त्या आहेत. आणखी दोन पदे रिक्त असल्याचेही सीएमओने सांगितले. याव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांनी विविध कामांसाठी ३६ इंटर्न्ससुद्धा नियुक्त केले आहेत. याशिवाय, मंजूर पदांवर कोणतीही व्यक्ती नियुक्त केली असती तरी शासनावर तेवढाच भार आला असता, असेही सीएमओने स्पष्ट केले अाहे.

सीएमओच्या ओएसडींचे वेतन : - कौस्तुभ धवसे : 1 लाख ३०,४०१ - केतन पाठक : 1 लाख १६,१५४ - रविकिरण देशमुख : 1 लाख १६,१५४ - सुमित वानखेडे : ८८,८४८ - प्रिया खान : ८८,८४८, - निधी कामदार ७९,७३१, - अभिमन्यू पवार ६१,०७२ - श्रीकांत भारतीय ८७,९००.