आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minster Devendra Fadanvis\'s Daughter\'s Surprise Gift

Xclusive: \'पप्पूडी\'चं CM ना स्पेशल गिफ्ट, वाचा लेकीनं कोणतं गिफ्ट घेतलंय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- दिविजा फडणवीस आणि तिची आजी सरिता फडणवीस)
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आलेला हा त्यांचा पहिलाच वाढदिवस आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पावसाची अनियमितता यामुळे माझा वाढदिवस साजरा करु नका, असे त्यांनी सांगितले आहे. राज्यकर्ते या नात्याने त्यांनी घेतलेली भूमिका अगदी योग्य आहे. पण या एवढ्या महत्त्वाच्या प्रसंगी चिमुकल्या लाडक्या लेकीनं वडीलांना काहीच गिफ्ट देऊ नये असे होऊ शकते का... नाही ना... दिविजानं त्यांच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट घेतलंय. आज हे गिफ्ट ती राज्याचे मुख्यमंत्री आणि तिचे पप्पा यांना देणार आहे.
(divyamarathi.com च्या प्रतिनिधी अनुजा कर्णिक यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन ही विशेष मुलाखत घेतली आहे. दिव्य मराठी वेब मीडियाची ही Xclusive मुलाखत आहे.)
देवेंद्र फडणवीस यांना आज महाराष्ट्राच्या कानाकोप-यांतले त्यांचे असंख्य चाहते, राजकारणातले हितचिंतक, आणि जवळचे नातेवाईक अन् मित्रमंडळी, अनेक महागड्या भेटवस्तू द्यायला उत्सुक असतील. पक्षश्रेष्ठींपासून ते कार्यकर्ते आणि सामान्य जनतेपर्यंत अनेकांच्या शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होईल. पण सगळ्या शुभेच्छांचा त्यांना क्षणभरात विसर पडावा, असं एक सुंदर सरप्राइज त्यांच्या ‘पप्पूडी’ने त्यांच्यासाठी प्लॅन केलंय. आणि हे सरप्राइज त्यांच्या पप्पूडीने फक्त divyamarathi.com सोबत शेअर केलंय.
ही ‘पप्पूडी’ म्हणजे आहे, त्यांचा काळजाचा तुकडा, दिविजा देवेंद्र फडणवीस. सहा वर्षांची ही चिमुरडी, देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी ‘वर्षा’ बंगल्याच्या दिवाणखान्यातल्या सोफ्यावर मांडी ठोकून, पेपर आणि मोठी रंगपेटी घेऊन आपल्या ‘बाबू’साठी ग्रिटींग बनवत बसली होती. दुपारच्या वेळातच हे काम उरकायची तिला घाई होती. कारण तेव्हाच तर आई-बाबा घरी नसतात. आणि टेनिस क्लास सुरू होण्याच्या अगोदरचा निवांतवेळ तिला मिळतो. ग्रिटींग बनवण्यात गुंग असलेल्या दिविजाला न थांबवता मग आम्ही तिच्यासोबत गप्पा मारायला सुरूवात केली.
ग्रिटींग कार्डचं गुपित divyamarathi.com ला सांगताना दिविजा म्हणाली, “मी असंच एक ग्रिटींग फादर्सडेला बनवून बाबाला दिलं होतं. काय माहिती कुठे गेलं. म्हणून मग आता पून्हा बनवून देतेय. आणि एवढंच नाही, माझ्या पिगीबँकमध्ये मी जमवलेल्या पैशांतून मी बाबासाठी हनुमान चालिसा पण आणलीय. कारण मला माहितेय, माझं ग्रिटींग त्याच्यासोबत नाही राहणारं पण हनुमान चालिसा राहिलं. आणि त्याला हनुमान चालिसा वाचायला खूप आवडते."
(सर्व फोटो- अजित रेडेकर)
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय सांगतेय दिविजा तिच्या बाबूबद्दल....