आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अयोग्य’ चिक्कीचे वाटप 10 जुलैपासून बंद केले, राज्य सरकारची हायकोर्टाला माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अंगणवाडीत विद्यार्थ्यांना वाटप होणारी चिक्की खाण्यासाठी अयोग्य असल्याच्या तक्रारी आल्याने राज्य सरकारने १० जुलैपासून विद्यार्थ्यांना चिक्कीचे वाटप बंद केले आहे, अशी माहिती राज्य सरकारतर्फे सोमवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली.
हायकोर्टाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींमार्फत २०६ कोटींच्या चिक्की घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका संदीप अहिरे यांनी दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांच्या नेतृत्वातील न्यायपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. विद्यार्थ्यांशी संबंधित प्रकरणांत सरकारने जबाबदारीने काम करावे, अशी टिप्पणी न्यायमूर्तींनी केली. या प्रकरणी सविस्तर प्रतिज्ञापत्र पाच ऑगस्टपर्यंत दाखल करण्याचे निर्देशही राज्य सरकार आणि इतर संबंधितांना देण्यात आले. चिक्कीची खरेदी करताना प्रक्रियेची अंमलबजावणी झाली का आणि ती खाण्यास योग्य आहे का, या दोन मुद्द्यांमध्ये लक्ष घालायला हवे, असेही न्यायालयाने सांगितले.