आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानपरिषदेत मुंडे विरुद्ध मुंडे; धनंजय, पंकजा यांचे वाक् युद्ध रंगले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चिक्‍की घोटाळ्याप्रकरणी
आक्रमक होत टीका केली. दरम्‍यान, त्‍यांना उत्‍तर देण्‍यासाठी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे उभे राहिल्या असता विरोधकांनी गोंधळ घालत मंत्री नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याची मागणी केली. यामुळे दहा मिनिटांसाठी कामकाज तहकुब करण्‍यात आले. त्‍यानंतर पंकजा यांनी धनंजय यांनी उपस्थित केलेल्‍या प्रश्‍नांची उत्‍तरे दिलीत.
पंकजा मुंडे यांचा राजीनामा घ्‍या : धनंजय
विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धंजजय मुंडे यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या कारभारावर गुरुवारी घणाघाती टीका केली. चिक्की, आयुर्वेदिक बिस्किटे, वॉटर प्युरिफायर, चटया, ताटे यांच्या खरेदीमध्ये मोठा गैरकारभार असून, यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप त्‍यांनी विधान परिषदेत केला. शिवाय पंकजा मुंडे यांच्‍या राजीराम्‍याची मागणीही केली. धंनजय म्‍हणाले, ‘‘ पाणी पाजणे हे पुण्याच काम; पण चिक्‍कीबरोबरच बिस्किट आणि वॉटर फिल्टरसाठी दरकरारातही मोठा घोटाळा झाला. वॉटर फिल्टरचा दरकरार होण्यापूर्वीच ऑर्डर देण्यात आली. शिवाय ज्‍या गोवर्धन आयुर्वेदिक फार्माला बिस्किट देण्‍याचा कंत्राट देण्‍यात आला तिला बिस्किट तयार करणाची परवानगीच नाही. तसेच सहा वर्षांपासून बंद असलेल्‍या नागपूरच्‍या वैद्य कंपनीला नऊ कोटी रुपयांच्‍या ताटांचे कंत्राट दिले’’, याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्‍यांनी केली. शिवाय चिक्की प्रकरणात संबंधित विभागाच्या अधिका-यांनी आणि मंत्र्यांनी चिक्की चांगली असल्याचे रिपोर्ट दिले होते. ते सर्व मॅनेज होते, असा आरोपही त्‍यांनी केला.
नाते नात्‍याच्‍या ठिकाणी
धनंजय मुंडे म्‍हणाले, घोटाळा करणा-यांसोबत माझे रक्‍ताचे नाते आहे. ते नात्‍याच्‍या ठिकाणी; पण राजकारणही राजकारणाच्‍या ठिकाणी आहे. त्‍यामुळे चिक्‍की घोटाळा प्रकरणी कारवाई झालीच पाहिजे, असेही धनंजय मुुंडे म्‍हणाले.
पंकाजा म्‍हणाल्‍या, ‘गरिबाचे अन्‍न खाण्‍याचे वृत्‍ती नाही’
पंकजा म्‍हणाल्‍या, ‘‘206 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्‍याचा आरोप होत आहे. पण, गरिबाचे अन्‍न खाण्‍याची माझी वृत्‍ती नाही. माझ्यावर बालीशपणाने आरोप केले जात आहेत. चिक्कीसाठी अंगणवाडी सेविकांनी माझे आभार मानलेत, एका मुलाला चार - चार चिक्की देता येते अशा शब्दांत त्यांनी माझे कौतुक केले. राज्‍यात 70 लाख 99 हजार 374 लाभार्थी आहेत त्‍यासर्वांना पोषण आहार देताना तारेवरची कसरत’’, असे स्‍पष्‍टीकरण त्‍यांनी दिले. आम्‍ही चिक्‍की खरेदीचे निर्णय डोळे झाकून घेतले नाही. सर्व विभागांकडू अभिप्राय मागवून आणि चर्चा विनिमय करून निर्णय घेत. पण, पुणे जिल्हा परिषदेने स्वतःहून १ कोटीची चिक्की खरेदी केली त्‍यात आमचा संबंध नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.
मुख्‍यमंत्री खवळले
विरोधकांनी गोंधळ घातल्‍यानंतर आरोप करत असाल तर आरोपावरील उत्तर ऐकून घेण्याचीही हिंमत दाखवा, अशा शब्‍दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले.