आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या शोषणाविरोधात लवकरच दुसरे धोरण; रिअँलिटी शोवर नियंत्रण येणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुलांच्या कोणत्याही शोषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार लवकरच दुसरे बालहक्क धोरण जाहीर करणार आहे. पुढील महिन्यात होणार्‍या मंत्रिमंडळ बैठकीत धोरणाचा मसुदा मांडण्यात येणार आहे. या धोरणामुळे मालिका व रिअँलिटी शोमध्ये काम करणार्‍या मुलांसाठी अधिक सुरक्षा निर्माण होईल.

धोरणामध्ये मुलांच्या, वैयक्तिक, शारीरिक, धार्मिक, आर्थिक, भावनिक आणि इतर हक्कांवर विशेष तरतूद असेल. तसेच शाळांमध्ये मुलांना मारहाण आणि मानसिक पिळवणूक यावरदेखील मुद्देसूद उपाय योजण्यात आले आहेत. मुलांचे लैगिंक शोषण, बालविवाह यांवर पालक व शिक्षकांनी करायच्या उपाययोजनांचाही यात समावेश करण्यात आला आहे. विशेष मुलांसाठीदेखील धोरणात अनेक तरतुदी आहेत. यात त्यांना शिक्षणासाठी देण्यात येणार्‍या अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे. तसेच विशेष मुलांना शिक्षण देण्यासाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक करण्यात येईल. बालकामगार असलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणण्याची तरतूद यात करण्यात आली आहे.

हरवलेल्या मुलांबाबत गुन्हे नोंदवण्याची तरतूद : नव्या धोरणानुसार हरवलेल्या प्रत्येक मुलाबाबत पोलिसांना गुन्हा हा नोंदवावाच लागेल. या कामासाठी पोलिसांनी विशेष आर्थिक सोय करावी तसेच मुलांचा शोध घेण्यासाठी आणखी मनुष्यबळ लावावे, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

काय आहे नव्या धोरणात
मुलांच्या शारीरिक, मानसिक, धार्मिक, भावनिक आणि इतर हक्कांवर गदा येता कामा नये.
शाळा किंवा मुलांच्या वसतिगृह परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यात येऊ नये.
रस्त्यावर किंवा पदपथावर मुलांनी न झोपण्यासाठी शासनाने तरतूद करावी.