Home »Maharashtra »Mumbai» Children Fight Husband Lady Mumbra Suicide Thane

ठाणे: पोटच्या दोन मुलांना इमारतीच्या 15व्या मजल्यावरून फेकून विवाहितेची आत्महत्या

दिव्य मराठी वेब टिम | Mar 20, 2017, 12:57 PM IST

  • ठाणे: पोटच्या दोन मुलांना इमारतीच्या 15व्या मजल्यावरून फेकून विवाहितेची आत्महत्या
ठाणे: पतीसोबत सततच्या भांडणाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेने आपल्या दोन मुलांना आधी इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून खाली फेकले. त्यानंतर स्वत: उडी घेऊन आत्महत्या केली. मुंब्रा परिसरात ही घटना घडली.
तौसिफच्या हातापायांना मार लागल्याने तो बचावला आहे. तर, चार वर्षांच्या अमरीनसह २७ वर्षीय शिरीन खान यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पतीबरोबरच्या सततच्या भांडणाला कंटाळून शिरीन यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
मुंब्रा कौसा येथील रशीद कंपाऊंड परिसरातील हिल व्ह्यू अपार्टमेंटमध्ये ही महिला कुटुंबासह राहत होती. तौसिफ (७) आणि आमरीन (४) ही दोन मुले होती. रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शिरीन आपल्या दोन मुलांना सोबत घेऊन शिबलीनगर येथील दोस्ती कन्स्ट्रक्शनच्या इमारतीत घर पाहण्यासाठी गेली होती. फ्लॅट बघण्याच्या बहाणा करत इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर जाऊन मुलांना खाली फेकले. त्यानंतर स्वत: उडी घेतली. डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended