आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्टिस्ट हेमाच्‍या पतीने नग्‍न होऊन केला होता गुजरात दंगलीचा निषेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नग्‍न होऊन चिंतन यांनी केलेले आंदोलन. इन्‍सेट हेमा. - Divya Marathi
नग्‍न होऊन चिंतन यांनी केलेले आंदोलन. इन्‍सेट हेमा.
मुंबई - कांदिवली परिसरातील एका नाल्‍यात सफाई कामगाराला दोन वेगवेगळ्या बॉक्‍समध्‍ये प्रसिद्ध शिल्‍पकार हेमा उपाध्याय आणि त्‍यांचे वकील हरीश भंभानी यांचे मृतदेह आढळले. या प्रकरणी पोलिसांना महत्‍त्‍वाची माहिती मिळाली असून, 5 लाख रुपयांसाठी गोटू नावाच्‍या व्‍यक्‍तीने हा खून केल्‍याचे एका ट्रक चालकाने सांगितले. दरम्‍यान, हेमा आणि त्‍यांच्‍या पतीने पटत नव्‍हते. त्‍यामुळे पोलिस सर्व शक्‍यता पडताळून पाहात आहेत. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे हेमा यांच्‍या पतीविषयी...
नग्‍न होऊन केला होता ‘गुजरात दंगली’चा निषेध
हेमा यांचे पती चिंतन उपाध्याय हेसुद्धा सिद्धहस्‍त चित्रकार आहेत. ते मूळ जयपूर येथील रहिवासी आहेत. यापूर्वी गुजरात सरकारचे विरोधक म्‍हणून ते चर्चेत आले होते. वर्ष 2002 मध्‍ये झालेल्‍या दंगलीचा निषेध म्‍हणून त्‍यांनी गुजरातच्‍या बडोदरा येथील अल्कापुरी सर्जन आर्ट गॅलरीमध्‍ये नग्‍न होऊन सरकार विरोधात प्रदर्शन केले होते.
घेतली होती हळद लावून
आर्ट गॅलरीमध्‍ये आलेल्‍या लोकांकडून चिंतन यांनी नग्‍न होऊन आपल्‍या अंगाला हळद लावून घेतली होती. त्‍यांच्‍या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला होता. त्‍यातूनच त्‍यांना हळद लावण्‍यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, बीफप्रकरणात झाली होती अटक... घरात लावले होते अश्लिल रेखाचित्रे