मुंबई- मुंबईजवळील पवईतील हिरानंदानी गार्डनमधील चित्रार्थ फिल्म स्टुडिओला आज दुपारी अचानकपणे आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही. आगीत कोणतीही जिवित हानी झाली नसली तरी आर्थिक हानी मोठी झाल्याची शक्यता आहे.
हिरानंदानी गार्डन परिसर हा पवईतील अतिशय पॉश भाग आहे. येथे अनेक पंचतारांकित अपार्टमेंट व कार्यालये आहेत. हिरानंदानी गार्डनमध्येच चित्रार्थ नावाचा फिल्म स्टुडिओ आहे. या स्टुडिओमध्ये आज जमाई राजा मालिकेचे शूटिंग सुरु होते. त्यासाठी सेट बनविण्यात आला. त्याला आज दुपारी अचानकपणे आग लागली. आगीचे कारण पुढे आले नसले तरी शॉर्ट-सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या चार बंबानी आग आटोक्यात आणली. या आगीत संपूर्ण फिल्म स्टुडिओ जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
पुढे पाहा, चित्ररथ फिल्म स्टुडिओला लागलेल्या आगीची छायाचित्रे...