आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसाक मुजावर, रेखा कामत यांना चित्रभूषण सन्मान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चित्रपट क्षेत्रात योगदान देणार्‍या मान्यवरांना दरवर्षी देण्यात येणारे चित्रभूषण व चित्रकर्मी पुरस्कार शुक्रवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे जाहीर करण्यात आले.

ज्येष्ठ चित्रपट समीक्षक इसाक मुजावर आणि अभिनेत्री रेखा कामत यांना चित्रभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके यांनी पत्रकार परिषदेत दिली. 51 हजार रुपये, मानपत्र, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 15 जुलै रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे, गायिका उत्तरा केळकर, सरला येवलेकर, जयमाला काळे या कलाकारांसह जयसिंग कांबळे, रामा कांबळे, विश्वनाथ भारती हे निर्माते व तंत्रज्ञ व औरंगाबादचे सिने पत्रकार अशोक उजळंबकर आदी 21 जणांना ‘चित्रकर्मी’ या पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.