आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईश्वरचिठ्ठीचा निर्णय मान्य नाही, सेनेचे पराभूत उमेदवार सुरेंद्र बागलकर कोर्टात जाणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ईश्वरचिठ्ठी टाकून झालेला नशिबाचा निर्णय मान्य नसल्याचे सांगत शिवसेनेचे पराभूत उमेदवार सुरेंद्र बागलकर न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. ईश्वर चिठ्ठीऐवजी टेंडर व्होट प्रक्रिया केली जावी यासाठी बागलकर आग्रही आहेत.
 
महापालिकेच्या वाॅर्ड क्रं.२००  मध्ये शिवसेनेच्या सुरेंद्र बागलकर आणि भाजपच्या अतुल शहांना ५९४६ इतकी समसमान मते पडली होती.दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने फेरमतमोजणी करण्यात आली.
 
फेरमत मोजणीतही मतांमध्ये कोणताच फरक न पडल्याने ईश्वर चिठ्ठीचा निर्णय घेण्यात आला. ईश्वर चिठ्ठीने लॉटरी पद्धतीने भाजपच्या अतुल शहांना विजयी घोषित करण्यात आले.
 
मात्र, लॉटरी पद्धतीने झालेला निर्णय मान्य नसल्याने पाच टेंडर व्होट मोजले जावेत यासाठी आपण न्यायालयात जाणार असल्याचे  बागलकर म्हणाले. दरम्यान, मुंबईतील मतदार याद्यांत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे. तसेच याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सेनेच्या सूत्रांनी सांगितले.  त्यामुळे आता भविष्यात काय होते हे पाहावे लागेल.  
 
टेंडर मत म्हणजे काय..?
मतदान केंद्रातील प्रतिनिधीने एखाद्या मतदाराबाबत आक्षेप घेतला असेल आणि त्या मतदाराकडे मतदान करण्यासठी लागणारे सर्व पुरावे असतील, तर त्याला मतपत्रीकेच्या मध्यमातून मतदान करण्यास सांगितले जाते. हे मतदान इव्हीएम मशिनद्वारे न होता, मतपत्रीकेद्वारे करण्यात येते. याला टेंडर मत म्हणतात. हे मतदान मतमोजणीवेळी न मोजता न्यायालयात उघडले जाते. सुरेंद्र बागलकर यांच्या वार्ड क्रमांक 220 मध्ये असे पाच मते आहेत. हे पाचही मतदान मोजण्यात यावे. या मागणीसाठी बागलकर कोर्टात जाणार आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...