आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - राज्यातील नागरिक दररोज मंत्रालयात येत असतात. या ठिकाणी येणा-या प्रत्येकाची तपासणी केली जाते. एखाद्याकडे संशयास्पद वस्तू आढळल्यास त्याची सखोल चौकशी होते. मात्र, सोमवारी एका जणाकडे मोठा चाकू सापडला तरी पोलिसांनी चौकशी न करता केवळ चाकू जप्त करून त्याला आत सोडले. त्यानंतर तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयात फिरून आला.
सोमवारी दुपारी एक जण मुख्यमंत्री कार्यालयात जाण्यासाठी आला. गार्डन गेटवर त्याने पास घेतला. त्यानंतर त्याच्याकडील बॅग स्कॅनिंग मशीनमध्ये टाकण्यात आली. तेव्हा त्यात चाकू आढळला. त्यानंतर पोलिसांनी तो चाकू काढून ठेवून त्याला मंत्रालयात जाऊ दिले. त्यानंतर त्याने मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन पत्र दिले. त्या पत्रात रस्त्यावर राहणा-या लोकांतर्फे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्याची इच्छा असल्याचे लिहिलेले होते. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिका-याला चाकूची घटना सांगितल्यावर तोसुद्धा अवाक् झाला. तो नालासोपारा येथील फ्लायओव्हरखाली राहत असल्याचे त्याने दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी एक जण मोटरसायकलवर बसून गार्डन गेटमधून आत शिरण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या मागे एक महिलाही बसली होती. पोलिसांनी त्याला येथून प्रवेश नसल्याचे सांगून परत पाठवले. खरे तर त्याची पोलिसांनी सखोल चौकशी करावयास हवी होती. मंत्रालयाचा दरवाजा सगळ्यांना ठाऊक असून तेथे कोणीही जाऊ शकत नाही, असे असताना तो बाइकवरून गेटच्या आत येतो आणि पोलिस त्याला चौकशी न करता जाऊ देतात याचा अर्थ पोलिस बेजबाबदार आणि निष्काळजीपणे वागल्याचे एका अधिका-याने सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.