आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Choppers Lose Way In Mumbai City Due To Concrete Jungle

अंबानींना धोका: हेलिकॉप्‍टर 1 हजार फुटांवरून उडविण्याची हवी परवानगी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो: रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या \'एंटिलिया\' या बंगल्याच्या छतावरील हेलिपॅडवरून उड्डाण भरतात) - Divya Marathi
(फाईल फोटो: रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या \'एंटिलिया\' या बंगल्याच्या छतावरील हेलिपॅडवरून उड्डाण भरतात)
मुंबई- मुंबईतील ऊंचच ऊंच इमारतीपासून मुकेश अंबानी आणि राहुल बजाज यासारख्या उद्योगपतींना धोका निर्माण झाला आहे. या उद्योगपतींच्या कंपन्या रिलायन्स, बजाज ग्रुप शिवाय भारत फोर्ज कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांना 1000 ते 1300 फुट ऊंचीवरून हेलिकॉप्टर उडविण्याची परवानगी द्यावी. सध्या हेलिकॉप्टर उड्डाणासाठी 500 ते 700 फुट ऊंचीवरून परवानगी आहे. मात्र, मुंबईत अलीकडच्या काळात अनेक इमारती 500 फुटांपेक्षा ऊंच असल्याने हेलिकॉप्टरला अपघात होण्याची भीती या उद्योगपतींनी व्यक्त केली आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनेक बड्या कंपनीची कार्यालये आहेत. बडे उद्योगपतीही मुंबई शहरातच राहतात. त्यामुळे त्यांना सतत ये-जा करावी लागते. याशिवाय वरिष्ठ अधिका-यांनीही सतत प्रवास दौरे करावे लागतात. ही कामे वेळेत व तत्काळ होण्यासाठी कंपन्याचे मालक, अधिकारी हे हेलिकॉप्टरचा वापर करत असतात. मुंबई, नवी मुंबई, पुणे व नाशकात विविध कंपन्यांची कार्यालये, उत्पादन युनिट्स आहेत.
मुकेश अंबानी हे आपल्या 'एंटिलिया' बंगल्यावर बनवलेल्या हेलिपॅडवरून नवी मुंबईसाठी उड्डाण करतात. मात्र, त्यांच्या हेलिकॉप्टरांच्या उड्डाण मार्गावर शहरातील अनेक ऊंच इमारती लागतात. फ्लाईट मार्गावर इमारती येत असल्याने रेडियो कम्युनिकेशनशी संपर्क तुटतो. ज्यामुळे हेलिकॉप्टरला उड्डाण भरण्यासाठी अडचणी येत आहेत. हा मुद्दा 21 मार्चला झालेल्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. हेलिकॉप्टर आणि नागरी विमान उड्डाण मंत्रालयाशी संबंधित अधिका-यांच्या या बैठकीत यावर चर्चा झाली. एअर ट्रॅफिक मॅनेजमेंटचे जीएम जयंत दासगुप्ता यांनी या बैठकीत यासंदर्भात अभ्यास केला जाईल असे सांगितले.
खराब वातावरणात धोका वाढतो-
भारत फोर्ज कंपनीचे चीफ पायलट कर्नल दिलीप शरद रानडे यांनी सांगितले की, खराब वातावरणावेळी रडार यंत्रणेला हेलिकॉप्टरच्या हालचाली टिपण्यास अडचण येते. अशावेळी एयर ट्रॅफिक कंट्रोलकडून रेडियो कम्युनिकेशनद्वारे संपर्क साधणे आवश्यक असते. मात्र, आता उड्डाण मार्गात ऊंच ऊंच इमारती बांधल्या जात असल्याने रेडियो कम्युनिकेशन यंत्रणेत दोष निर्माण होत आहे. अशा वेळी पायलट स्वत:च्या अनुभवावर व हिंमतीवर हेलिकॉप्टर चालवतो. पावसाच्या दिवसात व्हिजिब्लिटी कमी होते अशावेळी अपघाताचा धोका वाढतो.
इमर्जन्सी लॅँण्डिंगवेळी अडचण-

चार्टर फ्लाईट ऑपरेट करणारे कॅप्टन के के सिंह यांनी सांगितले की, 'कमी ऊंचावरून उड्डाण भरल्यास धोका जास्त राहतो. इमर्जन्सीच्या वेळी हेलिकॉप्टरला इकडून-तिकडे फिरवणे कठीण जाते. एक हजार फुटावरील ऊंचीवरून हेलिकॉप्टर आरामात इकडे-तिकडे फिरवू शकतो. कारण संपूर्ण आकाश मोकळे असते. सध्या मुंबईत शहरात उंच इमारती वाढू लागल्या आहेत तसेच या इमारतीवर क्रेनही लागलेल्या असतात.
पुढे आणखी वाचा, यासंदर्भातील माहिती....