आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : छोटा राजन भारतात आणण्‍यासाठी पोलिसांचे पथक इंडोनेशियात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय दुतावासाचे मुख्‍य सचिव संजीव अग्रवाल राजनसोबत चर्चा करताना. - Divya Marathi
भारतीय दुतावासाचे मुख्‍य सचिव संजीव अग्रवाल राजनसोबत चर्चा करताना.
बाली / मुंबई - इंडोनियातील बाली पोलिसांच्‍या अटकेत असलेला कुख्‍यात अंडरवर्ल्‍ड डॉन छोडा राजन याची आज (रविवार) भारतीय दुतावासाचे मुख्‍य सचिव संजीव अग्रवाल यांनी भेट घेतली. या बाबत ते म्‍हणाले, राजन याला कायदेशीर मार्गदर्शन करणे हाच या भेटीचा उद्देश होता, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. दरम्‍यान, दुसरीकडे राजन याला भारतात आणण्‍याच्‍या हालचाली गतीमान झाल्‍या असून, राजन याने भारत सरकार आणि इंडोनिया पोलिसांना पत्र लिहून भारतात जाण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली. दरम्‍यान, त्‍याला आण्‍यासाठी रविवारी मुंबई पोलिस, दिल्‍ली पोलिस आणि सीबीआयाचे विशेष पथक चार्टर विमानाने बालीकडे रवाना झाले आहे. मंगळवारपर्यंत राजन भारत येऊन शकतो.
कमांडोज जाणार आणयला
एकेकाळी दाऊदचा निकटवर्तीय असलेल्‍या छोटा राजन हा आता दाऊद आणि डी कंपनीचा क्रमांक एकचा शत्रू आहे. त्‍यामुळे त्‍याच्‍यावर अनेक वेळा प्राणघातक हल्‍लेही झाले आहेत. त्‍याला भारतात आणताना हल्‍ला होऊ शकतो, हे गृहित धरून त्‍याला आणण्‍यासाठी बाली येथे सीबीआय आणि पोलिस अधिकाऱ्यांच्‍या पथकासोबत काही कमांडोजही पाठवले जाणार आहेत. एवढेच नाही तर तीन स्नाइपर शूटर्सही नरज ठेवून असणार आहेत.

दाऊद बाबत मिळणार महत्‍त्‍वाची माहिती
त्‍या नंतर आता भारताने दाऊदच्‍या अटकेसाठी हालचाली गतीमान केल्‍यात. दरम्‍यान, छोटा राजन याच्‍याकडून 1993 च्‍या मुंबई बॉम्‍बस्‍फोट प्रकरणी मिळणारी माहिती सरकारसाठी महत्‍त्‍वाची ठरणार आहे. विशेष म्‍हणजे गत महिन्‍यामध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्‍या यूएई दौऱ्यात दाऊदची संपत्‍ती सील करण्‍याची मागणी केली होती. आता होऊ घातलेल्‍या ब्रिटेन दौऱ्यातही ते दाऊदचा मुद्दा उपस्‍थि‍त करणार असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

काय माहिती देऊ शकतो छोटा राजन ?
> दाऊद पाकिस्‍तानात कुठे आहे, त्‍याचे नेटवर्क आणि त्‍याच्‍या हालचाली बाबत छोटा राजन भारताला माहिती देऊ शकतो.
> इंटेलिजेंसच्‍या एका अधिकाऱ्यानुसार, ''दाऊदविरुद्ध कारवाई करण्‍यासाठी छोटा राजनची अटक खूप महत्‍त्‍वाची आहे. त्‍यासाठी मदतच होईल.''
> असे सांगितले जाते की, छोटा राजन आतापर्यंत भारताच्‍या सुरक्षा संस्‍थांच्‍या संपर्कात होता. त्‍याने दाऊद बाबत काही माहिती दिली आहे. आता त्‍याच्‍या अटकेनंतर आणखी काही बरीच माहिती मिळणार आहे.

कोण आहे छोटा राजन ?
> राजन (वय 55) हा कुख्‍यात गुंड आहे. मागील 20 वर्षांपासून तो भारतातून फरार आहे. वर्ष 1995 मध्‍ये इंटरपोलने त्‍याला मोस्ट वॉन्टेड घोषित केले होते.
> एकेकाळी तो दाऊदचा खूप विश्‍वासू होता.
> दाऊदसोबत वाद झाल्‍यानंतर त्‍याने आपली वेगळी गँग तयार केली.
> त्‍याच्‍यावर भारतात 68 केस आहेत. त्‍यात खून, दरोडे, अपहरण, ड्रग्स आणि स्मगलिंगचे गंभीर गुन्‍हे आहेत.
पुढे वाचा, राजन म्‍हणाला मी आयुष्‍यभर दहशतवादाविरुद्ध लढलो आताही लढणार...