आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉनच्‍या प्रेमात असलेली ही अभिनेत्री बनली साध्वी, होती छोटा राजनची गर्लफ्रेंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कुख्‍यात अंडरवर्ल्‍ड डॉन छोटा राजनला भारतात आणले. त्‍याच्‍या विरुद्ध मुंबईमध्‍ये खून, खंडणी, अपहरण, स्मगलिंग असे 70 पेक्षा अधिक गुन्‍हे दाखल आहेत. त्‍यांचा तपास सीबीआयकडे सोपवण्‍यात आला. 1980 च्‍या दशकात त्‍याचा बॉलीवुडमध्‍ये दबदबा होता. त्‍याच्‍या केवळ एका फोन कॉलवर अनेकांना भूमिका मिळत होती. ममता कुलकर्णी हिलासुद्धा छोटा राजनमुळेच रोल मिळाला असे सांगितले जाते. एवढेच नाही तर एके काळी ममता ही छोटा राजनची गर्लफ्रेंड होती.
राजनच्‍या सहकार्यासोबत जोडले गेले नाव
ममता आणि छोटा राजनचे ब्रेकअप झाल्‍यानंतर राजनचा सहकारी तथा ड्रग स्मगलर विक्की ऊर्फ विक्रम गोस्वामीसोबत ममताचे नाव जोडले गेले. दरम्‍यान, ममताने बॉलीवुड करिअरला अलविदा केला. राजन दुबईला गेल्‍यानंतर विक्कीच राजन याचा ड्रग बिजनेस सांभाळत होता. नंतर विक्की आणि ममता भारत सोडून गेले. मध्‍यंतरी असेही वृत्‍त आले होते की, विक्‍कीला पोलिसांनी अटक केली.
अभिनेत्रीपासून बनली साध्वी
कधी काळी आपल्‍या ग्‍लॅमरस आणि बोल्ड अंदाजाने चर्चेत असलेली ममता कुलकर्णी आता साध्वी बनली आहे. बॉलीवुडला रामराम ठोकून ती आता अध्यात्‍माच्‍या मार्गावर चालत आहे. वर्ष 2013 मध्‍ये तिचे 'ऑटोबायोग्राफी ऑफ एन योगिनी' हे पुस्‍तकही प्रकाशित झाले. यात तिने म्‍हटले की, ''काही लोक जगाच्‍या कामासाठी जन्‍म घेतात तर काही देवासाठी. मीसुद्धा देवासाठीच जन्‍माला आली आहे'', असे तिने म्‍हटले. त्‍यामुळे तिने बॉलिवूड का सोडले याचे कारण स्‍पष्‍ट झाले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा ग्‍लॅमरस अभिनेत्री ममता कुलकर्णी साध्वी झाली....