आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडीबोली भाषेतील 'चुक्की'ने जिंकली रसिकांची मने; दीर-भावजय यांचे प्रेमळ चित्रण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पु. भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)- 90 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात झाडीबोली भाषेतील 'चुक्की' या कथेने रसिकांची मने जिंकली. विदर्भातील प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री डॉ.सुमीता कोंडबत्तुनवार यांनी रविवारी संध्याकाळी हि कथा येथील पू.भा.भावे साहित्य नगरीतील कथा कथन कार्यक्रमात सादर केली.

'चुक्की' ही गडचिरोली जिल्हयातील भामरागड परीसरातील कथा असून चुक्की नावाची आदिवासी स्त्री आपल्यावरील अन्यायाचा कसा सूड घेते, हे या कथेत अत्यन्त प्रभावीपणे चित्रित करण्यात आली आहे.

या कथेत दीर भावजय यांचे प्रेमळ चित्रण, जंगलातील दृश्य प्रतीक व प्रतीमा यांचा सुंदर संगमही यात साधण्यात आला आहे. सरकारी व्यवस्था, पोलिस यंत्रणा व नक्षलवाद यांचात नाहक बळी जाणारा आदिवासी चीन्नाच मन हेलावनारे वर्णन, झाडीबोलीतील अपूर्व शब्दसंपदा व लोकवाणी, गेयता हा खजिनाच या निमित्ताने रसिकासमोर उलगडण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...