आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Churchgate Accident: After Accident Break Failed ?

चर्चगेट अपघात : अपघातानंतर ब्रेक निकामी केले ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकातील लोकलच्या अपघातानंतर रेल्वे बोर्डाच्या नियमांना डावलून पुराव्यात छेडछाड करण्याचा प्रयत्न रेल्वेच्या कर्मचा-याने केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, आपल्याकडे कोणतीही माहिती आली नसून काही दिवसांत येणा-या अहवालानंतरच कारण स्पष्ट होईल, असे पश्चिम रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक ब्रिगेडियर सुनीलकुमार सूद यांनी सांगितले.

२१ जून रोजी चर्चगेट स्थानकात मोटारमनने वेगमर्यादा न पाळल्याने लोकल गाडी फलाटावर चढली होती. प्रवाशांना हादरवून टाकणा-या या अपघातानंतर मोटारमनला लोकलमधून बाहेर काढण्यात आले. मात्र त्याचेळी रेल्वेच्या एका कर्मचा-याने मोटरमनच्या केबीनमध्ये प्रवेश करून ब्रेकला हात लावला होता. त्यावेळी जोरात आवाज झाल्याची माहिती पुढे आली आहे. अपघातानंतर मोटरमनला वाचवण्यासाठी तसेच ब्रेक फेल करण्यासाठी हा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
रेल्वे बोर्डाच्या नियमानुसार, रेल्वेत एखादा अपघात झाल्यास जखमी प्रवाशांना किंवा कर्मचा-यांना मदत करण्याची मुभा आहे. मात्र अपघातानंतर कोणत्याही वस्तूला किंवा रेल्वेतील यंत्रणेला हात लावू नये, असा नियम आहे. याची माहिती असतानाही रेल्वेचा एक कर्मचारी मोटारमनच्या केबीनमध्ये शिरला. त्याने ब्रेकला हात लावल्याने जोरात आवाज झाल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत पश्चिम रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांच्याकडे विचारणा केली असता, या अपघाताप्रकरणी चौकशी समिती स्थापन केली आहे. आठवड्याभरात ही समिती अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील, त्यामुळे अहवाल आल्यानंतरच याविषयावर भाष्य करणे योग्य राहील, असे सूद यांनी सांगितले.