आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पन्नास काेटी उभारण्याची क्षमता असलेली शहरे ठरणार स्मार्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशात स्मार्ट शहरे उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली अाहे. प्रारंभी ५० काेटी रुपयांचा निधी उभारण्याची अाणि त्यानंतर पुढील पाच वर्षांत २०० काेटी रुपये अतिरिक्त खर्च करण्याची क्षमता असलेल्या शहरांची स्मार्ट शहर प्रकल्पासाठी निवड हाेण्याची शक्यता अाहे. महाराष्ट्र सरकार जुलै अखेरपर्यंत दहा संभाव्य स्मार्ट शहरांचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याची शक्यता अाहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेला पहिल्या पाच वर्षांत ५० काेटी रुपयांचा निधी उभारता येण्याची क्षमता हवी तसेच पुढील पाच वर्षांतच अतिरिक्त २०० काेटी रुपये खर्च करण्याची तयारी असेल तरच स्मार्ट शहर प्रकल्पासाठी निवड हाेण्यासाठी ही प्राथमिक अट असल्याचे नगर विकास खात्याने म्हटले अाहे.

६ महानगरपालिका अाणि १८ नगर परिषदांना सूचना
नगर परिषदा अाणि महानगरपालिकांनी १० जुलैपर्यंत स्मार्ट शहर उभारण्यासाठीचा अाराखडा अाणि त्यांचे गुण निकष नगर विकास खात्याकडे सादर करायचे अाहेत. त्यानंतर दहा शहरांमध्ये त्यांची निवड करता येईल, असे नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी सांगितले. केंद्राकडून अालेल्या नियमावलीनुसार राज्य सरकारने २६ महानगरपालिका अाणि १८ नगर परिषदांना बुधवारी सूचना पाठवल्या अाहेत.

गुणांचे निकष
अार्थिक क्षमता अाणि या याेजनेची कशा प्रकारे अंमलबजावणी करणार या मुख्य निकषांवर शहरांची निवड करण्यात येणार अाहे. स्वच्छ भारत मिशन (एकूण गुण १०), अाॅनलाइन तक्रार निवारण ( ५ गुण), कर, शुल्क अादी माध्यमातून गाेळा हाेणारा अंतर्गत महसूल (१० गुण) अादींच्या अंमलबजावणीसाठी देण्यात येणाऱ्या गुणांचे निकषही स्थानिक स्वराज्य संस्थांना पूर्ण करावे लागणार असल्याचे नगर विकास खात्याने म्हटले अाहे.