आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Citizens Participation Expect In City Cosultants Forum

नागरिकांचा सहभाग अपेक्षित शहर सल्लागार मंचाची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड होणा-या प्रत्येक शहरात एक स्थानिक सल्लागार मंच असेल. राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समिती(एचपीएससी) व्यतिरिक्त ही व्यवस्था असेल. शहरातील प्रशासन आणि सुधारणा यात नागरिकांना सक्रिय सहभाग घेता यावा, हा त्यामागील हेतू आहे. या शहरस्तरीय मंचात गैरसरकारी संस्था (एनजीओ), चेम्बर ऑफ कॉमर्स, महिला गट, करदात्यांची संघटना यांचा समावेश आहे.

नियंत्रणासाठी तीन समित्या
राष्ट्रीय समिती : नगरविकास मंत्रालयाचे सचिव अध्यक्ष असलेली ही सर्वोच्च समिती असेल. स्मार्ट सिटी मिशनच्या प्रस्तावांना मंजुरी व कामाच्या प्रगतीवरील देखरेख, निधी देणे अशी जबाबदारी.
राज्य उच्चाधिकार समिती : मुख्य सचिव अध्यक्ष. महापौर, आयुक्त, वित्त विभागाचे प्रधान सचिव, नगररचनाचे प्रधान सचिव, नगर विकासचे प्रतिनिधी, एसपीव्हीचे सीईओ, निवडक महापौर/ नगराध्यक्ष, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी सदस्य.

शहर सल्लागार मंच : जिल्हाधिकारी, खासदार, आमदार, महापौर, सीईओ, युवक, तज्ज्ञ, नागरी संस्थांचे अध्यक्ष, करदाते संघटनेचा सदस्य, महिला गट, चेम्बर ऑफ कॉमर्स, युवक संघटना, एनजीओचे प्रतिनिधी