आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होर्डिंग्जविरोधी मोहीम सुरूच ठेवा : हायकोर्ट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई, पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरात गेल्या दोन दिवसांत काढलेल्या बेकायदा होर्डिंग्जच्या मोहिमेचे स्वागत करतानाच ही कारवाई यापुढेही कायम सुरू राहावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्रवारी महापालिका प्रशासनांना दिले.

एका याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने 13 मार्च रोजी मुंबई, पुणे, मीरा भायंदर, ठाणे यांच्यासह राज्यातील प्रमुख महापालिकांना 24 तासांत बेकायदा होर्डिंग्ज हटवण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाचा दट्ट्या बसताच महापालिकांच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर मोहीम राबवून हजारो बेकायदा होर्डिंग्ज काढले व शुक्रवारी त्याची माहिती न्यायालयात दिली. त्यानुसार मुंबईतील 5065, मीरा भार्इंदरमध्ये 1204 होर्डिंग्ज काढल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

महापालिकांच्या या कारवाईचे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर व ए. पी. भंगाळे यांच्या खंडपीठाने स्वागत केले. बेकायदा होर्डिंग्ज हटवणे हे केवळ पालिकांचेच काम नाही, तर पोलिस व राजकारणी नेत्यांचीही ही जबाबदारी असल्याचेही स्पष्ट केले.