आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीतील मुलीवर वर्गमित्रांनी बलात्कार करून घटनेचा तयार केला व्हिडिओ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीवर चार वर्गमित्रांनी बलात्कार करून घटनेचा व्हिडिओ तयार केला, तसेच तो इंटरनेटवर अपलोड केल्याची घटना मुंबईतील मालाड येथे घडली. पीडित मुलीच्या काकूने व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याबाबत मुलीच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर अल्पवयीन आराेपींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

पीडित मुलगी व मुले ही दहावीत शिकतात. अाठ नोव्हेंबर रोजी चारपैकी एका मित्राने घरी कोणी नसल्याची संधी साधत पीडित मुलीला अभ्यासासाठी आपल्या घरी बोलावले. या वेळी तिथे आधीच तीन मित्र अालेले होते. त्यानंतर चौघांनी तिच्यावर अत्याचार केले. तसेच घटनेवेळी चित्रीकरणही केले. यातील एकाने हा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केला. काही दिवसांनी हा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पसरत जाऊन मुलीच्या काकूपर्यंत पोहोचला.
त्यानंतर चाैकशी केली असता मुलीने तिच्यावरील प्रसंगाची माहिती कुटुंबीयांना दिली. मुलीच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर चौघांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.